अभिनेता अनिल कपूरच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा
अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रुझ येथील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली.
मुंबई : अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रुझ येथील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली.
ऑफिसमध्ये विनापरवाना अंतर्गत काम
अनिल कपूरने २,५०० स्क्वेअरफुटच्या ऑफिसमध्ये विनापरवाना अंतर्गत काम केले होते. या ऑफिसमध्ये लहान पार्टीशन तयार करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती.
अनिल कपूरचे नोटीसकडे दुर्लक्ष
दरम्यान, ऑफिसअंतर्गत कामाला परवानगीची आवश्यकता होती. मात्र, तशी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने तशी नोटीस यापूर्वीच सप्टेंबर महिन्यात बजावली होती. मात्र, नोटीसला कोणतेही उत्तर दिले नसल्याने शेवटी पालिकेच्या एच - वेस्ट विभागाने ही कारवाई केली.