`अॅनिमल`मधील बॉबी देओलची हिट डान्स स्टेप आली कुठून? कोरिओग्राफर सापडला
संदीप रेड्डी वांगाचा `एनिमल` या सिनेमाला भलेही संमिश्र प्रतिसाद मिळत असेल मात्र या सिनेमातील गाणी हिट आहेत. मात्र या सिनेमात जास्त कोणाचं कौतुक झालं असेल तर ते बॉबी देओलच्या अभिनयाचं. या सिनेमातील बॉबीच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.
मुंबई : संदीप रेड्डी वांगाचा 'एनिमल' या सिनेमाला भलेही संमिश्र प्रतिसाद मिळत असेल मात्र या सिनेमातील गाणी हिट आहेत. मात्र या सिनेमात जास्त कोणाचं कौतुक झालं असेल तर ते बॉबी देओलच्या अभिनयाचं. या सिनेमातील बॉबीच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. या सिनेमातील 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर तो थिरकताना दिसला होता. या गाण्यात तो थिरकताना दिसला होता. खरंतर या इराणी गाण्यावर तो डान्स करत असलेला त्याचा एन्ट्री सीन चर्चेचा विषय बनला आहे. पण तुम्हाला या व्हायरल गाण्याची कल्पना कुठून आली माहिती आहे का? एका मुलाखतीत बॉबी देओलने /eyeyl खुलासा केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या डान्सची कल्पना खरंतर त्याचीच होती. नुकताच याविषयी बोलताना म्हणाली की, हे खूपच क्रेजी आहे. लोकं आपल्या कुत्र्याच्या डोक्यावर ग्लास ठेवत आहेत आणि त्याला नाचवत आहे. तर कुणीतरी माझ्यासारखे कपडे घालून नाचत आहे हे सगळं पाहून मी भारावून जातोय. मला खूप आनंद होत आहे.
या सिनेमात बॉबी देओलने अबरार हक हे पात्र साकारलं आहे. डोक्यावर ग्लास ठेवून वेगळ्या अंदाजात नाचताना हा अभिनेता दिसला होता त्याची ही स्टाईल इतकी हिट झाली ही, प्रत्येकजण यावर वेगवेगळ्याप्रकारे डान्स करत होता. नुकताच एका मुलाखतीत याविषयी त्याला प्रश्न विचारण्यात आला. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी शूटिंगपूर्वी त्याच्यासोबत हे गाणं शेअर केलं होतं. शूटिंग दरम्यान, त्याने पंजाबमधील त्याच्या बालपणीचे दिवसांबद्दल सांगितलं, जिथे तो डोक्यावर ग्लास आणि चष्मा घालून नाचायचा आणि आता ही एक हिट स्टेप बनली आहे. ही स्टाईल अनेकांना खूप आवडली आहे.
कोणाचीच स्टेप कॉपी करायची नव्हती.
बॉबी देओलने यावेळी बोलताना सांगितलं की, त्याला कोणाचीच स्टेप कॉपी करायची नव्हती. याविषयी बोलताना बॉबी म्हणाला, मला अचानक ते दिवस आठवले, जेव्हा मी लहान होतो आणि आम्ही पंजाबला जायचो त्यावेळी आम्ही कसे नाचायचो हे देखील मला आठवलं. नशेत असताना डोक्यावर चष्मा कसा लावायचा ते आठवलं. मी नेहमी असं करायचो लहानपणी म्हणूनच मला हे आठवलं आणि मी ही कल्पना दिग्दर्शकाला ऐकवली. त्यालाही माझी ही कल्पना आवडली.'जमाल कुडु' हे गाणं ईराणचं खतारेह ग्रुपच्या ईराणी गाण्याचं 'जमाल जमालू' का रीक्रिएट वर्जन आहे. ज्याला हर्षवर्द्धन रामेश्वरने सिनेमाला रिक्रिएट केलं आहे. नाना पाटेकर यांच्या 'तिरंगा' चित्रपटातील ही डान्सस्टेप कॉपी केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र आता बॉबीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.