Bobby Deol's fan kissed him : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनं काल 27 जानेवारी रोजी 55 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. त्यात बॉबी खूप भयानक दिसत आहे. काल बॉबीला भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणांहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे कार्ड्स आणि गिफ्ट चाहत्यांकडून मिळाले. तर बॉबीनं पापाराझी आणि त्याच्या चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला. तर एक चाहती स्वत: केक आणि गिफ्ट घेऊन पोहोचली होती. तर बॉबी वेळात वेळ काढून त्याच्या या चाहतीशी भेटला. मात्र, सेल्फी काढत असताना त्या चाहतीनं थेट बॉबीला किस केलं. त्यावर बॉबीनं दिलेल्या रिअॅक्शनची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे त्या चाहतीला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉबीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत बॉबी त्याचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या चाहत्यांनी आणलेला केकसोबत देखील त्यानं पोज दिली. मात्र, त्यानंतर एका चाहतीनं त्याच्यासोबत पोज दिल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा हट्ट धरला. तर पापाराझी तिला बोलू लागले की आमच्याकडे आहेत फोटो आणि देतो बस झालं. चाहतीची इच्छा पाहता बॉबी त्यांना राहू द्या असं म्हणाला आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तयार झाला. बॉबी सेल्फी काढत असतानाचं त्या चाहतीनं त्याला किस केलं. तरी बॉबी चिडला नाही त्याला आश्चर्य झाले, तो शांत झाला तरी त्यानं हे सगळं शांतपणे सांभाळलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना


हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी त्या चाहतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कमेंट बॉक्समध्ये खूप कमेंट केल्या. एकानं कमेंट करत म्हटलं की 'जर हेच कोणत्या पुरुष चाहत्यानं कोणत्या अभिनेत्रीसोबत केलं असतं तर?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'जर पुरुष चाहत्यानं असं अभिनेत्रीसोबत असं केलं असतं तरी काही मोठी गोष्ट होणार नाही, जर ज्या प्रकारे बॉबीनं शांतपणे हे सगळं हाताळलं तसं तिनं हाताळलं तर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे चुकीचं आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या परवानगी शिवाय हात लावू शकत नाही किंवा किस करू शकत नाही.' मग कोणतंही लिंग असो. आणखी एक नेटकरी म्हणाला 'तिला तुरुंगवास व्हायला हवा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिला कळतं नाही का? थोडीही लाज नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'शिक्षित असूनही लोक असं करतात, त्यामुळेच सेलिब्रिटी खऱ्या चाहत्यांसोबत फोटो काढत नाहीत.'