मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान आणि ईद म्हटली तो चाहत्यांसाठी कोणता सिनेमा घेऊन येणार ? याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. यंदा ईदच्या मुहुर्तावर सलमान खानचा 'रेस 3' हा चित्रपट येणार आहे. 


दुबईत शूट झाले अ‍ॅक्शन सीक्वेन्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबंग' चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी खास अबुधाबीमध्ये या चित्रपटाचे अंतिम शेड्युल ठेवण्यात आले होते. याकरिता 'रेस 3' ची सारी टीम अबुधाबीमध्ये पोहचली होती. 
अबुधाबीतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट पूर्ण झाल्यानंतर 'रेस 3' ची टीम परतीच्या वाटेवर आहे. या क्षणाचे खास फोटो बॉबी देओलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विमानातील एक फोटो शेअर करताना आम्ही परत येत आहेत अशा आशयाचं खास ट्विट लिहलं आहे.  


फोटोमध्ये सलमान खान, बॉबी देओल, जॅकलीन, सलीम आणि निर्माते रमेश तुहरानी आहेत. 


 



 


अनिल कपूरदेखील 'रेस 3' चित्रपटामध्ये खास भूमिका साकारत आहेत. अबुधाबीतील त्यांचे शेड्युल पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत टीमच्या आधीच ते भारतामध्ये परतले आहे.