मुंबईः बॉलीवूडमध्ये दररोज कोणाच्या ना कोणत्या लिंक-अपच्या बातम्या समोर येत असतात. एकत्र काम करत असताना, चित्रपट कलाकारांचे एकमेकांच्या प्रेमात पडणे अगदी सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत काही बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली, पण नंतर त्यांनी लग्न केले. आज आम्ही तुमच्यासाठी अशा फिल्म स्टार्सची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांना अरेंज्ड मॅरेज करून सेटल होणं योग्य वाटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


माधुरी दीक्षित:  माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र, याआधी बॉलिवूड स्टार संजय दत्तसोबत माधुरीचे नाव चर्चेत होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे असं बोललं जातं



सनी देओल: सुपरस्टार सनी देओलने 1984 मध्ये पूजासोबत लग्न केले. ते सुद्धा एक अरेंज मॅरेज होतं. पण त्यापूर्वी सनीचं नाव अमृता सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. दोघांनी 1983 मध्ये 'बेताब' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सनीचा हा पहिलाच चित्रपट होता.



बॉबी देओल : सनीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ बॉबी देओलचेही नाव या यादीत सामील झालं आहे. बॉबीने 1996 मध्ये तान्या आहुजासोबत अरेंज मॅरेज केलं होतं. बॉबी आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या अफेअरनेही बरीच चर्चा झाली होती. बॉबीचे वडील धर्मेंद्र या दोघांच्या नात्याच्या विरोधात होते. त्यामुळे त्याचे नीलमशी लग्न होऊ शकले नाही.



शाहिद कपूर : बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचे नाव लग्नाआधी अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेलं.. ज्यामध्ये करीना कपूरसोबत त्याचं अफेअर बरंच चर्चेत होतं. मात्र, 2015 मध्ये कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याने मीरा राजपूतसोबत अरेंज मॅरेज केले.



गोविंदा: गोविंदाने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुनीता आहुजाशी लग्न केलं जे एक अरेंज मॅरेज होतं. पण गोविंदाचे नाव नीलम कोठारीसोबतही चर्चेत आलं होतं.  रिपोर्ट्सनुसार, गोविंदाच्या आईची इच्छा होती की सुनीता आपली सून व्हावी, त्यामुळे गोविंदाने नीलमपासून स्वतःला दूर केले.