Shefali Jariwala Birthday Celebrations: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर (Shefali Jariwala Instagram) तिचा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत असतो. शेफाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. अशातच आता शेफाली पुन्हा चर्चेत आली ती तिच्या नवऱ्यामुळे... ()


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेफाली जरीवालाने 15 डिसेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. पती पराग त्यागीसोबत (Parag Tyagi) लेट नाईट डिनर डेटवर ती स्पॉट झाली होती. जिथं परागने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर शेफालीला बर्थडे सरप्राईजचा (Shefali Jariwala Birthday Celebrations) खुलासा केला. परागने शेफालीसाठी खास टॅटू (Parag Tyagi Tattoo) बनवला ज्यामध्ये तिची जन्मतारीख दिसत होती. पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी परागने हा टॅटू काढला.


आणखी वाचा - लाल बिकनीतील Shefali Jariwala च्या हॉट आणि ग्लॅमरस अदा


शेफाली जरीवालाच्या वाढदिवसानिमित्त, तिच्या मित्रांनी आणि इंडस्ट्रीतील चाहत्यांनी तिच्यावर खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा (happy birthday) वर्षाव केला, परंतु तिचा दिवस खास बनला तो पती परागचे खास सरप्राईज... परागने शेफालीच्या वाढदिवसाची तारीख त्याच्या हातावर टॅटू करून घेतली आणि हे सरप्राईज पाहून शेफाली देखील शॉक झाली होती.


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, शेफालीने तिचा 40 वा वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल झाले आहेत. अतिशय स्टाइलिश आणि हॉट अभिनेत्री शेफालीने (Shefali Jariwala) तिच्या वाढदिवसाला ग्लॅमर जोडण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. शेफालीने काळ्या बूटांसह गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम स्वॅग दाखवला. मात्र, तिच्या नवऱ्याच्या हातावरचा टॅटू भलताच चर्चेच राहिलाय.