मॉस्को : मशिदीबाहेर एका रूसी मॉडेलने बिकिनीमध्ये फोटोशूट केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. धर्मगुरूंसोबतच अनेक संघटनांनी यावर आक्षेप व्यक्त करत मॉडेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मॉडेलने  प्रार्थनास्थळाचा अपमान केला आहे, त्यामुळे तिला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. अखेर सर्व परिस्थिती पाहून मॉडेल Maria Katanovaने माफी मागितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने माफी मागितली असली तरी, लोकांचा राग शांत झालेला नाही. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, मॉडेल Maria Katanovaचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मशिदीसमोर ओव्हरकोटमध्ये पोज देताना दिसत आहे.


तिने बिकिनी घालून त्यावर ओव्हरकोट घातला आहे. त्यानंतर तिने मशिदीबाहेर फोटोशूट केलं आहे. फोटो व्हायरल होताचं सर्वत्र खळबळ निर्माण झाली. प्रकरणा वाढल्यानंतर मॉडेलने सर्वांसमोर माफी देखील मागितली.


ती म्हणाली, 'फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या धार्मिक इमारतींचा वापर करण्यात आला आहे. ही एक सीरिज होती ज्यामध्ये अनेक मॉडेल्सचे फोटोशूट करण्यात आले होते. यादरम्यान कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते....'