Urfi Javed: बॉलिवूडमधील (Bollywood) जग जेवढं ग्लॅमरस (glamorous) आहे तेवढंच ते घृणास्पद (Disgusting) आहे. कास्टिंग काउच (Casting Couch ) हे या बॉलिवूडमधील काळं सत्य आहे. कास्टिंग काउचचा सामना बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना (Famous actresses) करावा लागला आहे. अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), कंगना रणावत (Kangana Ranaut), राधिका आपटे (Radhika Apte) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) या अभिनेत्रींनाही  कास्टिंग काउच सामना करावा लागला होता.  सोशल मीडियाची फॅशन ऑयकॉन Urfi Javed हीदेखील याची शिकार झाली होती. तिने  स्वतः एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता.
       


घृणास्पद किस्सा सांगताना म्हणाली की, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान उर्फी जावेदने खुलासा केला आहे की, जेव्हा या अभिनेत्रीने मॉडेल (model) म्हणून काम सुरू केले होतं, तेव्हा एकदा तिलाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. ती सांगते की, एकदा तीसुद्धा अशा परिस्थितीत आली होती आणि इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावं यात आहेत. (bold urfi javed forced into casting couch nm)


'या इंडस्ट्रीतील पुरुष...'


 उर्फी म्हणाली की, एकदा तिच्यावरही जबरदस्ती केली जात होती आणि या कास्टिंग काउच प्रकरणात अनेक मोठी नावे सामील होती. ती म्हणाले की, या इंडस्ट्रीतील (Industry) पुरुष खूप ताकदवान आहेत आणि अशा परिस्थितीत ते नवोदित अभिनेत्रींचा फायदा घेतात. उर्फी म्हणाली की, ती स्वतःला खूप भाग्यवान समजते की ती अशा परिस्थितीतून सुटली. उर्फीने कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला आहे.


उर्फी तिच्या कामासाठी तसंच तिच्या विचित्र फॅशन सेन्स आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या लूक(Look) आणि फॅशनमुळे (fashion) ती सोशल मीडियावर यूजर्सचं (users)लक्ष वेधून घेतं असते. उर्फी कायम पापाराझींच्या (Paparazzi) समोर वेगवेगळ्या अवतारात येतं असते.