Boldest Films Banned: बोल्ड कंटेंटमूळे `हे` चित्रपट भारतात झाले होते बॅन, जाणून घ्या
बोल्ड सीन्समुळे `हे` चित्रपट देशात रिलीजच झाले नाहीत, तरीही प्रेक्षकांनी पाहिले, तुम्हाला माहितीय का `हे` सिनेमे?
मुंबई : Boldest Films Banned देशात सध्या वेबसीरीजची क्रेझ आहे. अनेक प्रेक्षक सध्या चित्रपट पाहण्यापेक्षा वेबसीरीजला प्राधान्य देतात. या सीरीजमध्ये बोल्ड सीरीजने मोठी झेप घेतलीय. कारण वेब विश्वात सध्या बोल्ड वेब सीरीजची जास्त चर्चा आहे. मात्र तुम्हाला माहितीय बोल्ड वेब सीरीज प्रमाणेच आधीच्या काळात अनेक चित्रपट बनले आहे. मात्र चित्रपटातील बोल़्ड दृष्यामुळे आणि वाईट संवादामुळे हे चित्रपट भारतात बॅन करण्यात आले होते. त्यामुळे हे चित्रपट कधीच रिलीज झाले नाही. हे चित्रपट कोणते होते हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : टाईट ड्रेसमध्ये Giorgia Andriani चं बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क
बँडीट क्वीन
1994 साली बँडीट क्वीन (Bandit Queen) हा चित्रपट आला होता. हा चित्रपट शेखर कपूर निर्मित असून फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित होता. सेक्सुशल कंटेंट आणि शिव्यांमुळे या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने रिलीज करण्याची परवानगी दिली नाही.हा चित्रपट ऑनलाइन उपलब्ध आहे आणि तुम्ही तो YouTube आणि MX Player वर पाहू शकता.
कामा सुत्रा ए टेल ऑफ लव
बोल्ड कंटेंटच्या यादीत सर्वांत प्रथम बॅन झालेला चित्रपट म्हणजे कामासूत्र ए टेल ऑफ लव (Kama Sutra A Tale of Love). या चित्रपटाची निर्मिती मीरा नायर यांनी केली असून यात 16व्या शतकातील चार प्रेमवीरांचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटावर 'असंस्कृत' आणि 'अनैतिक' असल्याचा ठपका ठेवत बंदी घालण्यात आली.हा चित्रपट Vudu Movies & TV Store वर पाहता येईल.
'अनफ्रीडम'
'अनफ्रीडम' (Unfreedom) या चित्रपटावरही सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. 2015 चा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये लेस्बियन प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.
फायर
1996 साली प्रदर्शित झालेला फायर (Fire) हा दीपा मेहताचा चित्रपट परदेशात चांगलाच पसंतीस उतरला होता, पण भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती.या चित्रपटात शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात दोन अभिनेत्रींच्या लेस्बियन नात्याबद्दलची कहानी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
सिन्स
देशात बंदी घालण्यात आलेल्या बोल्ड चित्रपटांमध्ये 'सिन्स' (Sins) या चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. या चित्रपटात केरळमधील एका पंडिताची कथा दाखवण्यात आली आहे. हा पंडित एका महिलेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो.या चित्रपटातील नग्न दृश्यांमुळे सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटावर बंदी घातली होती. दरम्यान हा संपूर्ण चित्रपट नाही तर त्याच्या काही क्लिप डेलीमोशनवर पाहता येतील.
दरम्यान हे 5 भारतीय चित्रपट आहेत जे देशात बॅन करण्यात आले होते. बोल्ड कंटेंट आणि वाईट संवादामुळे हे चित्रपट कधीच रिलीज झाले नाही. मात्र तरीही प्रेक्षकांनी हे सिनेमे पाहिले आहेत.