मुंबई : बॉबी देओलची 'आश्रम 3' ही वेब सीरिज रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात कमालीचा बोल्डनेस दाखवण्यात आला आहे. या सिरीजच्या 3 भागाची चाहते मोठ्या प्रमाणात वाट पाहत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आश्रम' व्यतिरिक्त  MX Player वरील इतर सिरीजची यादी घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही मोफत पाहू शकता.



मस्तरामच्या कथा तुम्ही खूप ऐकल्या असतील, पण तुम्ही ही कथा पाहून आनंदही घेऊ शकता. या वेब सिरीजमध्ये राणी चॅटर्जी ही भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राणीने मस्तराम या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.



हॅलो मिनीला हिट बनवण्यात अभिनेत्रीने कोणतीही कसर सोडली नाही. या वेबसीरिजमध्ये प्रिया बॅनर्जी मुख्य भूमिकेत होती, जिने आपल्या हॉट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. यात अर्जुन अनेजा आणि गौरव चोप्रासारखे कलाकार आहेत.



जर तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल आणि रोमान्ससह हलक्याफुलक्या कॉमेडीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही कॅम्पस डायरीज पाहू शकता. अतिशय मजेदार ही सिरीज 6 विद्यार्थ्यांची कथा आहे.



जर तुम्हाला रोमँटिक चित्रपटांची आवड असेल तर तुम्ही रुहनियत सिरीज पाहू शकता. या मालिकेत अर्जुन बिजलानीने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय युविका चौधरी, अमन वर्मा आणि कनिका मान सारखे चेहरेही आहेत.