`त्यापेक्षा रिक्षा चालवा....`, जेव्हा प्रेम चोप्रा यांच्या मुलीने त्यांना दाखवला आरसा; `तुम्ही फार...`
1980 च्या दशकात ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत होते. तो काळ असा होता की, लोक जे पडद्यावर पाहायचे तेच खऱं आहे असं समजायचे. नुकतंच त्यांनी या सगळ्याकडे आपली मुलगी कशाप्रकारे पाहत होती याचा खुलासा केला.
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांनी आयुष्यातील जवळपास 60 वर्षं हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. आपल्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. 1980 च्या दशकात प्रेम चोप्रा जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत होते. तो काळ असा होता की, लोक जे पडद्यावर पाहायचे तेच खऱं आहे असं समजायचे. यामुळेच अनेक प्रेक्षकांमध्ये प्रेम चोप्रा यांची भिती होती. याचं कारण त्याकाळी प्रेक्षक आणि सेलिब्रिटी यांच्यात फार अंतर होतं. अभिनेते-अभिनेत्री सहजासहजी त्यांना दिसायचे किंवा भेटायचे नाहीत. तसंच त्यावेळी आताप्रमाणे सोशल मीडियाही नव्हतं. त्यामुळेच प्रेम चोप्रा यांची व्हिलनची प्रतिमा बराच काळ प्रेक्षकांच्या मनात राहिली. एकदा तर त्यांना त्यांच्या मुलीनेच हे घाणेरडं काम करु नका असं सांगितलं होतं.
मुलीनेच प्रेम चोप्रा यांना निगेटिव्ह रोल न करण्याची केली होती विनंती
प्रेम चोप्रा यांनी नुकतीच अरबाज खानचा शो 'द इन्व्हिन्सिबल'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुलगी रतिका चोप्राने त्यांच्या चित्रपटांवर काय प्रतिक्रिया दिली होती याचा खुलासा केला. तसंच कशाप्रकारे तिने त्यांना अभिनय सोडा आणि रिक्षा चालवण्याचा सल्ला दिला होता याबद्दलही सांगितलं. ती शाळेत असताना ही घटना घडली होती अशी माहिती त्यांनी दिली.
"रितिका नंदा आता लेखिकाही आहे. शाळेत असताना मला म्हणायची की, पप्पा मला सगळे शाळेत म्हणतात की तुम्ही फार गडबडवाले रोल करा. तुम्ही फार घाणेरडं काम करता. हे सोडून द्या," असा किस्सा त्यांनी सांगितला.
प्रेम चोप्रा यांनी यावेळी आपण कशाप्रकारे मुलीची समजूत काढली आणि लोकांनी या भूमिका स्विकारल्या आहेत हे पटवून दिल्याचंही सांगितलं. तसंच या भूमिका करत असल्यानेच मी तुला सर्वोत्तम शाळेत पाठवू शकत आहे हेदेखील समजावून सांगितलं. हा माझ्या कामाचा भाग आहे असं मी तिला समजावून सांगितल्याची माहिती प्रेम चोप्रा यांनी दिली.
प्रेम चोप्रा यांच्या मुलीने अभिनेता शर्मन जोशीशी लग्न केलं आहे. शर्मन जोशीने आपल्याला सासऱ्यांचं स्वप्न पडत असे असं सांगितलं होतं. शर्मन जोशीने प्रेम चोप्रा यांची दुसरी मुलगी प्रेरणा चोप्रा हिच्याशी लग्न केलं आहे. प्रेम चोप्रा यांची मुलगी असल्याने शर्मन जोशी तिला डेट करताने नेहमी घाबरायचा. एकदा एका संवादात, शर्मनने सासऱ्यांनी त्यांच्या अफेअरवर काय प्रतिक्रिया दिली होती याचा खुलासा केला होता. मला त्यांची स्वप्नं पडायची असं त्याने उपहासात्मकपणे म्हटलं. "मला वाटतं प्रेरणाला तिच्या आयुष्यात माझ्यासारखं अद्भुत कोणीतरी मिळणार होतं. ती नशिबवान आहे, माझ्याशी लग्न केलं, पण मला तर प्रेम चोप्रा यांची स्वप्नं पडायची"