मुंबई : हिंदी कलाविश्वातील एक अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब मानल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून लग्नसराईचे वारे वाहत आहेत. कपूर यांच्या बहिणी म्हणू नका किंवा मग रणबीर आलियाच्या नात्याबाबत होणाऱ्या चर्चा. एक अत्यंत उत्साही वातावरण या कुटुंबात कायमच पाहायला मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या कुटुंबातील एक हँडसम हंक अभिनेता सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. हा हँडसम हंक आहे आदर जैन. रणबीर कपूरचा आतेभाऊ असणाऱ्या आदरसोबत त्याची बहुचर्चित प्रेयसी तारा सुतारिया हिसुद्धा सध्या तिथंच आहे. ताराच्या वाढदिवसाच्याच निमित्तनं ही मंडळी येथे पोहोचली आहेत. 


आदरनं मालदिवच्या निसर्गसोंदर्याचे फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केल्याचं पाहायलाही मिळालं. पण, त्याच्या एका स्टोरीनं मात्र सर्वाचं लक्ष वेधलं. जिथं तो एका समुद्रकिनारी बसल्याचं कळत आहे. पुढ्यात एका पेयाचा ग्लास आहे आणि समोरच एक तरुणी केस बांधताना पाठमोरी दिसत आहे. 




 


View to a kill असा हटके हॅशटॅग देत त्यानं ही पोस्ट शेअर केली. ज्यानंतर ही ताराच असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला. तारा आणि आदर मागील वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं नातं आता नवं नाही. बऱ्याच कार्यक्रमांमध्येसुद्धा त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे. अरमान जैनचं लग्न असो किंवा मग कपूर कुटुंबातील एखादा समारंभ, ताराची उपस्थिती कायमच पाहायला मिळाली आहे. तेव्हा रणबीर- आलियाच्या सोबतीनं सध्या कपूर कुटुंबातील आदर आणि ताराचं नातंही बी- टाऊनमध्ये चर्चेत आहे असं म्हणायला हरकत नाही.