Aamir Khan Reveled Why Skips Awards Shows : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. आमिर खानच्या चित्रपटातून तो नेहमी एक सामाजिक संदेश देत असतो. त्यामुळे त्याचे चित्रपट बनवायला बराच वेळ लागतो. आमिर खान हा अनेकदा सार्वजनिक कार्यक्रम, बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात असतो. पण गेल्या काही वर्षांपासून तो ॲवॉर्ड शो पासून अंतर ठेवून आहे. तो ॲवॉर्ड शोमध्ये फार कमी वेळा हजेरी लावतो. आता आमिरने असं करण्यामागचे कारण सांगितले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखले जाते. कपिल शर्माने त्याच्या विनोदी अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सध्या हा कार्यक्रम टेलिव्हिजनऐवजी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. आता या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सहभागी झाला. 


खासगी आयुष्याबद्दलही केले अनेक खुलासे


‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. हा प्रोमो 1 मिनिटे 29 सेकंदाचा आहे. यात कपिल शर्मा हा आमिर खानला विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी आमिरने त्याच्या खासगी आयुष्यासह प्रोफेशनल आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले.


या प्रोमोच्या सुरुवातीला कपिल शर्मा हा एका ट्रॉलीमध्ये अनेक ॲवॉर्ड घेऊन येतो. त्यावेळी तो म्हणतो की हे सर्व ॲवॉर्डस एकाच व्यक्तीचे आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेता आमिर खान. यावेळी कपिल म्हणतो की मला अजूनही विश्वास होत नाही की आमिर खान इथे आले आहेत. त्यावर आमिर खान हा अभिनेता सुनील ग्रोवरसोबत 1500 रुपये द्या आम्ही येऊ, असे म्हणतो. त्याचे उत्तर ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. 


आमिर खानने सांगितले कारण


यानंतर अर्चना पुरन सिंह ही आमिर खानला ॲवॉर्ड शो मध्ये न जाण्यामागचे कारण विचारते. त्यावेळी आमिर खान हसतो आणि एका वाक्यात उत्तर देतो. "वेळ खूप मौल्यवान असते, त्याचा वापर विचारपूर्वक करायला हवा", असे आमिर खान म्हणतो. यानंतर तो गालातल्या गालात असतो. सध्या आमिरने दिलेले हे उत्तर आणि कार्यक्रमाच्या प्रोमोचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.