`त्या` गोष्टीच्या भीतीपोटी आमिरच्या मुलीनं उचललं मोठं पाऊल
हे सारंकाही आयराला प्रकाशझोतात आणणारं होतं.
मुंबई : बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याच्याबाबतच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळाल्या. त्यातच त्याची मुलगी आयरा खान हिनंही अनेकांचं लक्ष वेधलं.
मुळात ती आमिरची लेक असल्यामुळं तिची होणारी चर्चा आणि त्यात तिच्या रिलेशनशिपलाही याचवेळी मिळालेला वाव. हे सारंकाही आयराला प्रकाशझोतात आणणारं होतं.
आयरा सहसा तिच्या फिटनेसवर बरंच लक्ष देताना दिसते. पण, मधल्या काळात तिचं इथं दुर्लक्ष झालं.
आता म्हणे आयरानं पुन्हा एकदा फिटनेसकडे आपला मोर्चा वळवला आहे. थोडक्यात ती वजन घटवण्याच्या निर्णयावर पोहोचली आहे.
आमिरलाही याची कल्पना नसावी. पण, आयरा या निर्णयावर पोहोचली आहे.
वजन कमी करण्यासाठी मोठा निर्णय
आयरानं हल्लीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ती प्रियकर नुपूर शिखरे याच्यासोबत दिसत आहे.
फोटोसह कॅप्शनमध्ये तिनं वजन कमी करण्याच्या निर्णयाबाबत लिहिलं.
'मी हल्लीच वजन कमी करण्यासाठी 15 दिवस उपवास केला होता. मी जीवनात बरीच सक्रिय असते. पण, मागील 4-5 वर्षांत मी संथ झाले.
परिणामी माझं वजन 20 किलोंनी वाढलं. ही एकच बाब माझ्या मनात, डोक्यात आणि विचारांत घर करुन राहिली', असं तिनं लिहिलं.
आपण खुप जास्त वजन कमी तर नाही केलं ही बाब तिनं स्वीकारली. सोबतच यादरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी मात्र शिकल्या, निरिक्षणं केली असं ती म्हणाली.
बऱ्याच गोष्टींना पूर्णत्वास नेण्यासाठी आयरा मनात प्रचंड आशा बाळगून आहे. तेव्हा आता हे नवं वर्ष तिच्या या प्रयत्नांना यश देतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.