मुंबई: अभिनेता आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यातही आमिरसोबत बिग बी अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळणार असेल तर मग, ही तर चाहत्यांसाठी एक प्रकारची परवणीच आहे. सध्याच्या घडीला सिनेरसिकांना ही सुवर्णसंधी मिळत आहे ती म्हणजे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून आमिर आणि बिग बी असे दोन तगडे कलाकार झळकणार आहेत.


हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हाच मानस ठेवत या चित्रपटाचं तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही डबिंग करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.


हिंदीसोबतच इतरही दोन महत्त्वाच्या भाषांमध्ये हा चित्रपट डब होणार असल्यामुळे निश्चितच त्याच्या व्यवसायावरही याचा थेट परिणाम होणार आहे हे खरं.


आपला देश हा चित्रपटप्रेमींचाही देश आहे. चित्रपटांमुळे एक प्रकारे विविध संस्कृती जोडलेल्या असतात अनेकदा ज्यामुळे भौगोलिक सीमांचाही अडथळा येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


आता वेगळेपण सिद्ध करण्यात हा चित्रपट कितपत यशस्वी ठरतो हे येत्या काळात कळेलच. अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट दिवाळीच्या उत्साहपूर्ण वातावरणात म्हणजेच ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 


त्यासोबतच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचं कथानकही सर्व स्तरांवरील प्रेक्षकांची मनं जिंकणारं असल्याचं म्हणत त्यांनी चित्रपटाचं वेगळेपण पटवून दिलं