मुंबई : अभिनेता आमिर खान सध्या आपला सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शुटिंग उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये होत आहे. मात्र आता शुटिंगवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदाराने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोनीचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जरने आमिर खानवर कोविड-१९ चे नियम न पाळल्याचा आरोप लावला आहे. यासोबतच भाजप आमदाराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. आमिर खान गाझियाबादमध्ये शुटिंग करत असल्यामुळे चाहते अतिशय खुश होते. चाहते देखील आमिरला भेटण्यासाठी लोकेशनवर पोहोचले. आमिरने देखील चाहत्यांची भेट घेतली. मात्र तेव्हा आमिरकडून एक गोष्ट चुकली ती म्हणजे त्याने मास्क घातला नव्हता. 



भाजप आमदाराचं म्हणणे आहे की, कोविड प्रोटोकॉलचं आमिर खानने उल्लंघन केलं आहे. यामुळे आमिर खान विरोधात भाजप आमदाराने तक्रार दाखल केली आहे. 



आमिर खानला या सिनेमाच्या शुटिंगवेळी दुखापत झाली होती. मात्र या कारणामुळे त्याने शुटिंग थांबवली नव्हती. त्याने औषध घेऊन पुन्हा शुटिंगला सुरूवात कली. आमिरला पसलियोमध्ये दुखापत झाली होती.