Gumraah Teaser Out: सध्याचा जमाना आहे तो म्हणजे थ्रिलर वेब शोज (Thriller Shows) आणि चित्रपटांचा. त्यातून आता बॉलिवूडचे मोठे मोठे कलाकारही अशा विषयांवरील शोज आणि चित्रपट (Bollywood Upcoming Bold Webseries) करताना दिसत आहेत. त्यात सुष्मिता सेनचा 'आर्या' (Aarya), 'स्पेशल ऑप्स' (Special Ops), 'दिल्ली क्राईम' (Delhi crime) अशा काही शोजचा समावेश आहे. अशाच ट्रेण्डमध्ये आता आदित्य रॉय कपूरनंही (Aditya Roy Kapoor) उडी घातली आहे. आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर (Mrunal Thukar) आणि रॉनित रॉय (Ronit Roy) यांची प्रमुख भुमिका असलेला वेब शोचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यातून एका तासातच या वेबशोला लाखो व्ह्यूज आले आहेत. किसिंग सीन्स, पोलिस, गुन्हेगारी आणि रक्तपात अशा तद्दन मसाल्यानं भरलेल्या या शोची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या काही काळात असे शोज आता ट्रेण्ड सेटर बनणार आहेत. त्यातून आता या नव्या शोचीही सगळ्यांना उत्सुकता राहिली आहे. (Bollywood actor aditya roy kapoor mrunal thakur and rohit roy starring gumraah trailer goes viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमध्ये प्रेक्षकांनी नक्की पाहायला मिळणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. आदित्य रॉय कपूरचा चेहरा हा गेल्या काही दिवसांपासून गायब होता. आता त्याचा हा नवीन टीझर पाहून आदित्यचे चाहते उत्सुक झाले आहेत. या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की, आदित्य रॉय एका वेगळ्या लुकमध्ये दिसतो आहे. त्याच्यासोबतच या टीझरमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूरचाही वेगळा लुक पाहायला मिळतो आहे. ही कथा फार वेगळी वाटते आहे. रॉनित रॉयनं याआधी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. गेल्या वर्षीच अभिनेता रॉनित रॉयनं हॉस्टेज या वेबशोमधून आपल्या अभिनयकौशल्याचे दर्शन लोकांना करून दिले होते. 


मृणाल ठाकूरचा वेगळा लुक 


आता नव्या आलेल्या या गुमराह वेबसिरिजमधून पुन्हा एकदा वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मृणाल ठाकूर (Mrunal Thakur New Look) या अभिनेत्रीचाही मोठा फॅन बेस तयार झाला आहे. 'तुफान', 'जर्सी'सारख्या चित्रपटातून आलेली ही टेलिव्हिजन अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरवर पोहचली आहे. तिच्या या नव्या वेबसिरिजची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 



काय आहे गुमराह? 


या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केतकर यांनी केले आहे. या तीन दिग्गजांशिवाय या चित्रपटातून आणि काही कलाकारही आहेत. हा चित्रपट 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.