मुंबई : इंटरनेट आणि सोशल मीडिया यांची उपलब्धता आणि वाढता वापर पाहता या साऱ्याचे थेट परिणाम हे अनेकांच्याच खासगी आयुष्यावरही होत आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका बसतो तो म्हणजे सेलिब्रिटींना. एखादा फोटो किंवा व्हिडिओ सेलिब्रिटींकडून पोस्ट करतात किंवा इतर माध्यमातून त्याच्याविषयीची चर्चा होताना असा एखादा मुद्दा हेरुन त्याच मुद्द्यावर सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते, त्यांच्यावर टीका करण्यात येते. सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगमध्ये अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा पुन्हा एकदा अडकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजोबा, म्हणजेच अजय देवगचे वडील वीरू देवगण यांच्या निधनामुळे सारं कलाविश्व शोकसागरात बुडालं होतं. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच न्यासा चर्चेत आली. मंगळवारी न्यासाला मुंबईतील एका नामांकित सलूनबाहेर पाहायला मिळालं. 



न्यासाचे फोटो काही सेलिब्रिटी छायाचित्रकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच तिच्याविरोधात टीप्पणी करण्यास सुरुवात केली. 'तिला झालंय तरी काय, काल हिच्या आजोबांचं निधन झालं आणि आज ही सलूनमध्ये जात आहे...', असं म्हणत तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. 


एकिकडे न्यासाला निशाण्यावर धरलं जात असतानाच दुसरीकडे मात्र काही नेटकऱ्यांनी तिची पाठराखण केल्याचंही पाहायला मिळालं. त्यांमुळे ट्रोलर्समध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सोशल मीडियावर यापूर्वीही न्यासावर टीका करण्यात आली होती. तोकड्या कपद्यांच्या मुद्द्यामुळे ती चर्चेत आली होती.