Singham Again Release Date : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याने या चित्रपटात निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आता लवकरच 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल असे म्हटले जात होते. पण आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अजय देवगणने याबद्दलची माहिती दिली आहे. 


अजय देवगणने जाहीर केली तारीख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय देवगण याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सिंघम अगेन या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर सिंघम अगेन हे चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. त्यासोबत यात झळकणाऱ्या कलाकारांची नावेही दिसत आहेत.


यासोबतच या पोस्टरवर यंदाच्या दिवाळीत 2024 असेही नमूद करण्यात आले आहे. सिंघम अगेन या चित्रपटात करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, जॅकी श्रॉफ, अजय देवगण, अर्जुन कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना अजय देवगणने यंदाच्या दिवाळीसाठी सज्ज व्हा, सिंघम अगेन 2024 असे म्हटले आहे. 



गेल्या काही दिवसांपासून 'सिंघम अगेन' आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची टक्कर होणार असल्याचे बोललं जात होतं. कारण 'सिंघम अगेन' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. रोहित शेट्टी, अजय देवगण आणि चित्रपटाची संपूर्ण टीम 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिवसरात्र शूटींग करत होते. पण अखेर आता या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे 'पुष्पा 2' आणि 'सिंघम अगेन' यांची बॉक्स ऑफिसवरील टक्कर टळली आहे. 


येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार 


दरम्यान रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' या चित्रपटाच्या सीरिजमधील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाच्या सीरिजमधील तिसऱ्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. सिंघम अगेन असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.