मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगनला महागड्या गाड्यांची क्रेझ आहे. अजयकडे Land Rover Range Rover, MINI Cooper, BMW Z4सह अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत. पण आता अजयच्या या महागड्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीची भर पडली आहे. अजयने भारतातील सर्वात महाग कार खरेदी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयने सर्वात महागडी Rolls Royce Cullinan कार खरेदी केली आहे. अजयने गेल्या अनेक महिन्यांपूर्वी ही कार बुक केली होती.



कंपनीच्या वेबसाइटवर या कारची शो रुम किंमत ७ कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहे. ही या कारच्या बेस मॉडेलची किंमत आहे. Rolls Royce ग्राहकाच्या गरजांनुसार कार बनवते. त्यासाठी अनेकांना मोठी वाट पाहावी लागते. 


अजय देवगणच्या आधी मुकेश अंबानी यांनीदेखील या गाडीची खरेदी केली आहे. टी सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्या कलेक्शनमध्येही या गाडीचा समावेश आहे.