मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस Hathras gang rape  येथे १४ सप्टेंबरला एका १९ वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार करत तिचा सामूहिक बलात्कार करण्यात आला. ज्यानंतर जवळपास दोन आठवड्यांसाठी दिल्लीची सफदरगंज येथे तिच्यावर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय क्रूक कृत्य करत पीडितेचा छळ करण्यात आल्याची बाब जेव्हा समोर आली, तेव्हा जनमानसासह कलाविश्वही हळहळलं. अभिनेता अक्षय कुमार, रितेशय देशमुख आणि अनेकांनीच संतप्त प्रतिक्रिया देत झाल्या प्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजीचा सूर आळवला. इतकंच नव्हे, तर अशी कृत्य करत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्या, थेट अशी मागणी या अभिनेत्यांनी केली. 


हाथरस घटनेप्रती मनस्ताप आणि संताप व्यक्त करत या क्रूर कृत्याचा खिलाडी कुमारनं निषेध केला. 'हे सारं केव्हा थांबणार? आपली काय आणि सुव्यवस्था इतकी कठोर झाली पाहिजे की, असं काही करण्यापूर्वी साध्या विचारानंही यांचा (गुन्हे प्रवृत्ती असणाऱ्यांचा) थरकाप उडाला पाहिजे. गुन्हेकारांना फासावर चढवा', असं त्यानं ट्विटमध्ये लिहिलं. मुली आणि बहिणींच्या सुरक्षिततेसाठी किमान आतातरी आवाज उठवा, आपण इतकं करुच शकतो असं विनंतीवजा आवाहन त्यानं सर्वांनाच केलं. 




 


अभिनेता रितेश देशमुख यानंही ट्विट करत इतकं क्रूर कृत्य करणाऱ्यांना सर्वांसमक्ष फाशी दिली पाहिजे असाच विचार मांडता. अतिशय निर्दयीपणं तरुणीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठीच तो आग्रही दिसला. तिथं अभिनेत्री कंगना राणौत हिनंही सदर प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. किमान आतातरी या नराधमांना शिक्षा होण्यासाठी कायदा आणखी कठोर होणार का, हाच प्रश्न आता अनेक स्तरांतून उपस्थित करण्यात येत आहे.