मुंबई : कोणताही कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी फोन कृपया सायलेंट मोडवर ठेवा असं सांगण्यात येतं. कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा असो, त्यामध्ये व्यत्यय येता कामा नये अशीच अपेक्षा असते. पम, अनावधाने अनेकदा हाच फोन सायलेंट मोडवर ठेवण्याचं राहून  जातं आणि गोंधळ होतो. सध्या अशाच एका प्रसंगाचा सामना एका पत्रकाराला करावा लागला आहे, तोसुद्धा अभिनेता अक्षय कुमार याच्यासमोर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिशन मंगल' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेला अक्षयने हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटातील महिला ब्रिगेड म्हणजेच अभिनेत्री किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, तापसी पन्नू यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम सुरु झाला, कलाकार मंडळी माध्यमांच्या प्रतिनिंधीमकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. 


चर्चा सुरु असताना मध्येच एक फोन वाजला. माईकच्या मध्येच ठेवण्यात आलेला हा फोन अखेर खिलाडी कुमारने उचलला. क्रिष्णा या नावाने कोणीतरी त्या नंबरवर फोन करत होतं. हे पाहता फोन उचलत खिलाडी कुमार म्हणाला, 'हॅलो क्रिष्णाजी... हम लोग एक प्रेस कॉ्न्फरन्समें हैं. मैं अक्षय कुमार बोल रहा हूँ' 



अक्षयने पुढे हा फोन ज्यांचा आहे ते तुम्हाला नंतर फोन करतील असंही सांगितलं. त्याचा हा कारनामा पाहून व्यासपीठावर असणाऱ्या आणि त्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला. सोशल मीडियावर तर, खिलाडी कुमारची ही 'फोनाफोनी' चांगलीच व्हायरल झाली.