मुंबई:  हिंदी कलाविश्वात खिलाडी कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षयचा मुलगा आरव हा सध्या परदेशात शिक्षण आहे. असं असलं तरीही तो परदेशात नेमकं करतोय तरी काय यावर त्याची आई, अभिनेत्री- लेखिका ट्विंकल खन्ना आणि खुद्द अक्षयही जातीनं लक्ष ठेवून असतात. ट्विंकलने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ पाहून ही बाब लगेचच लक्षात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरवही अगदी आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय, हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं आहे.


सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा याचीच प्रचिती येत आहे. या व्हिडिओमध्ये आरव चालत्या ट्रेनमध्ये 'फ्लिप' करताना दिसत आहे.


आता हे 'फ्लिप' प्रकरण आहे तरी काय, असा प्रश्न पडत असल्यास ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडिओ नक्की पाहा.



हा व्हिडिओ शेअर करत ट्विंकलने त्यात किंचाळण्याचा येणारा आवाज हा आपल्या आत्याचा असून, आरवच्या स्टंटमुळे तिला धडकीच भरली हेच जणू सांगितलं आहे.


काही दिवसांपूर्वीच आरव १६ वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने एक सुरेख फोटो पोस्ट करत आरवला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं होतं.