मुंबई: #MeToo या चळवळीला सध्या कलाविश्वात चांगलीच हवा मिळत असून, त्यामध्ये अशा य.काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत हे पाहून अनेकांनाच धक्का बसत आहे. गायक, निर्माते आणि दिग्गज कलाकारांच्या नावांचा यात समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या यादीतील एक अनपेक्षित नाव ठरलं ते म्हणजे अभिनेते आलोकनाथ यांचं. लेखिका विनता नंदा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. 


आलेकनाथ यांनाच आता सर्व गोष्टींचं भय आहे, असं म्हणत विनता यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ज्यानंतर इतरही काही अभिनेत्रींनी त्याच्याविरोधात आवाज उचलत लैंगिक शोषण आणि असभ्य वर्तणूकीचे आरोप त्यांच्यावर केले होते. 


आपल्यावर होणारे हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हणत आलोकनाथ यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आता यातच पुढचं पाऊल म्हणून त्यांनी विनता नंदा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. 



तेव्हा आता आलोकनाथ यांनी दाखल केलेली ही तक्रार पाहता त्यावर पुढे नेमकी काय कारवाई केली जाणार आणि विनता यांवर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.