Amitabh Bachchan Tips To Quit Smoking and Drinking: मागील अनेक दशकांपासून हिंदी (Bollywood) कलाविश्व आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. एक कलाकार म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवं शिकणाऱ्या आणि आपल्या वागण्याबोलण्यातून इतरांनाही खूप काही शिकवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कलाक्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. अशा या अभिनेत्याला चाहत्यांचं अमाप प्रेम मिळालं आणि त्यांच्या लोकप्रियतेत सातत्यानं भर पडताना दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी आणि जुनी पिढी आणि त्यांना जोडणारा दुवा असणारे बिग बी अमिताभ बच्चन विविध माध्यमांनी चाहत्यांच्या संपर्कात आले. आताही त्यांनी असाच एक मार्ग निवडत आपल्या जीवनातील एका प्रसंगातून चाहते आणि फॉलोअर्सनाही अप्रत्यक्षरित्या मोलाचा सल्ला दिला आहे.


एक दिवस असं झालं की.... 


मद्यपान (Drinking) आणि धुम्रपानाशी (Smoking) संबंधित भूतकाळातील एक किस्सा बिग बींनी ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणला. जिथं त्यानी सांगितलं की, एकदा महाविद्यालयीन दिवसांमध्ये कसे त्यांचे काही मित्र मद्यपान करम्यासाठी प्रयोगशाळेत आले. ही तीच घटना होती, ज्यानंतर त्यांनी या व्यसनांपासून पाठ फिरवली. हा तोच क्षण होता जो त्यांना आयुष्यभरासाठी धडा शिकवून गेला होता. 


बिग बींनी ब्लॉगमध्ये काय लिहिलं? 


'प्रयोग, प्रात्यक्षिकं म्हटलं की शालेय दिवस आठवतात. जिथं कायम कोणत्याची अभिव्यक्तीचा संदर्भ प्रात्यक्षिकांशी व्हायचा. रसायनांची मिश्रणं, प्रयोगशाळेतील उपकरणांशी खेळणं आणि खूप काही. महाविद्यालयातील हे रोजचं जगणं... आणि एके दिवशी जेव्हा पदवी अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपरही झाला तेव्हा काही मित्र प्रयोगशाळेत मद्यपान करून जल्लोष करत होते. ते प्रयोगासाठी म्हणून काहीही न मिसळता मद्य प्राशन करत होते. यानंतर ते अतिशय वाईटरित्या आजारीही पडले. या घटनेनं मला धडाच शिकवला. मद्यपान केल्यानं होणारे दुष्परिणाम मला कळले होते.'


मद्यपान किंवा धुम्रपा करणं किंवा सोडणं हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी धुम्रपान सोडणं हा सर्वस्वी त्यांचाच निर्णय होता. आज कैक वर्षे उलटूनही बच्चन यांनी मद्य अथवा सिगरेटला स्पर्शही केलेला नाही. 


स्वानुभवातून शिकले बिग बी... 


मद्यपानाच्या अतिरेकानं घात केल्याचं बिग बींनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात बऱ्याचदा पाहिलं. पुढे जेव्हा ते कोलकाता येथे नोकरीसाठी आले तेव्हा तिथं  'सोशल ड्रिकिंग' होऊ लागलं. किंबहुना आपण मद्यपान करत नव्हतो ही बाबही त्यांनी नाकारली नाही. पण, ही सवय मोडणं हा वैयक्तिक निर्णय असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. धुम्रपानाच्या बाबतीतही तेच. 


हेसुद्धा वाचा : हातात वाईनचा ग्लास घेत म्हणतेय 'जे करायचंय ते करते'; अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोनं चुकवला काळजाचा ठोका 


 


एकदा ठरवलं की ही गोष्ट आपल्याला करायची नही, की ती करायचीच नाही. हाच सर्वात सोपा मार्ग आहे असं ते म्हणाले. सिगरेट ओठांजवळ नेऊन चुरगळून टाका, मद्याचा ग्लास फोडून टाका.... या सवयी मोडण्याचा हाच एक मार्ग असू शकतो असं म्हणत त्यांनी सर्वांनाच उद्देशून आपलं मन मोकळं केलं