हातात वाईनचा ग्लास घेत म्हणतेय 'जे करायचंय ते करते'; 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोनं चुकवला काळजाचा ठोका

 Halle Berry Viral Photo: चर्चा सुरु आहे एका अभिनेत्रीच्या फोटोची आणि तिच्या बोल्ड अंदाजाची. वयाच्या 55 व्या वर्षी तिनं शेअर केलेला फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलेली आहे.   

Updated: Apr 11, 2023, 12:28 PM IST
हातात वाईनचा ग्लास घेत म्हणतेय 'जे करायचंय ते करते'; 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोनं चुकवला काळजाचा ठोका title=
(छाया सौजन्य- हॅले बेरी इन्स्टाग्राम) actress Halle Berry shared bold intimate photo as she took a sip of wine

Halle Berry Bold Photo : सहसा सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणं, एखादं मत मांडणं किंवा व्यक्त होणं या साऱ्यामागे काही कारणं असतात. काही हेतू असतात. अर्थात काही पोस्ट यासाठी अपवादही असतील. पण, बहुतांश सोशल मीडिया कंटेंटमागं हेतू असतो हे नाकारता येत नाही. हो, तो हेतू नेमका ज्या अंदाजाच मांडला जातो त्याची मात्र प्रचंड चर्चा होते. पोस्ट करणाऱ्याच्या कल्पनाशक्तीबाबत मतप्रदर्शनंही होताना दिसतात. यामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या पोस्ट बऱ्याच बोलक्या असतात. 

सध्या अशाच एका अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी या अभिनेत्रीनं एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर आणि त्याहूनही इन्स्टाग्राम (Halle Berry Instagram) वर्तुळात खळबळ माजवली आहे. ईस्टर विकेंडच्या निमित्तानं या अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यात डोकावण्याची संधीही फॉलोअर्स आणि चाहत्यांना दिली. 

या अभिनेत्रीचं नाव आहे हॅले बेरी (Halle Berry) . 'मला जे करायचंय ते मी करते', असं थेट शब्दांतील कॅप्शन लिहित तिनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाल्कनीमध्ये उभी असून, तिच्या हातात एक वाईनचा ग्लास दिसत आहे. अतिशय बोल्ड अशा या फोटोमध्ये ती न्यूड असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्यप्रकाराश न्हाऊन निघालेलं तिचं रुप अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवत आहे. 

ट्रोलर्सना दणका देऊनही काहीजण तिला म्हणताहेत... 

इथं हॅलेनं पोस्ट केलेला फोटो चित्रपट वर्तुळात चांगलाच चर्चेत आलेल्या असताना आणि तिनं सोशल मीडिया ट्रोलर्सना जणू चपराक मारलेली असताना तिथं तिला काहींनी पुन्हा निशाण्यावर घेतलं. 

'विचार करा, तुम्ही 50 वर्षांचे आहात आणि हे असे फोटो पोस्ट करत आहात....', 'नातवंडांसोबत वेळ घालवण्याच्या वयात हिचं काय सुरुये...? ', 'वय होताना इतरांना मानसन्मान मिळवण्याला आता काहीही महत्त्वं नाहीये' अशा बऱ्याच द्वेषपूर्ण कमेंट तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या. याचं उत्तर देत हॅलेनं इतकंच म्हटलं की, 'तुम्हाहा माहितीये ना एका कोळंबीचं हृदय तिच्या डोक्यात असतं...?'. 

हेसुद्धा पाहा : होणाऱ्या पत्नीसोबत Anant Ambani नं साजरा केला वाढदिवस; खास Photos Viral 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Halle Berry (@halleberry)

फार मोजक्या शब्दांत हॅलीनं केलेली ही कमेंट पाहता, तिनं निशाणा साधणाऱ्यांना स्पष्टपणे उत्तर देत त्यांना नि:शब्द केल्याचं पाहायला मिळत आहे. हॅलीच्या या फोटोला तिच्या कलाकार मित्रांकडून मात्र तितकाच सकारात्मक प्रतिसाद मिळतानाही दिसत आहे.