मुंबई : बॉलिवूडचा शहनशाह, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी तब्बल पाच दशके बॉलिवूडवर राज्य केले आहे. अनेक हिट सिनेमे देऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज ते बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. हा दिग्गज अभिनेता नेमका किती शिकला आहे? हे तुम्हाला माहितीय का? नाही ना, मग चला जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी झाला. अमिताभ यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. 1973 मध्ये आलेल्या 'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. 


शिक्षण
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 7 क्लाइव्ह रोड येथील बॉईज हायस्कूल (BHS) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथून सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले.दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन त्या दिवसांत शाळेत मित्रांसोबत मार्बल खेळायचे. यानंतर त्यांनी नैनिताल येथील शेरवुड कॉलेजमधून शिक्षणही घेतले आणि येथेच त्यांची भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी मैत्री झाली. या शाळेत अमिताभ थिएटर ग्रुपमध्येही भाग घेत असत.


महाविद्यालयीन शिक्षण
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी चंदीगढ येथील सरकारी महाविद्यालयात गेले, पण तेथे त्यांचे मन लागले नाही. यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून विज्ञान विषयात बॅचलर पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करून त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली.


आगामी चित्रपट 
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन हिंदी सिनेविश्वातील अँग्री यंग मॅन बनले आहेत. त्याच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आनंद (Anand), कालिया (Kaalia), शोले (Sholay), डॉन (Don), शराबी (Sharaabi), ब्लैक (Black), मोहब्बतें (Mohabbatein), कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham) आणि बागबान (Baghban) सारखी हिट चित्रपट दिली. लवकरच अमिताभ त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.