मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्याच्या मंचावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आतापर्यंत हजेरी लावलीये. अनेक सेलिब्रिटी आपल्या सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये आवर्जुन हजेरी लावत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला हवा येऊ द्या शोच्या माध्यमातून शोमधील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. ज्यामुळे हा शो अनेकांच्या हृदयात स्थान करुन आहे. जगभरात चला हवा येऊ द्या चे चाहते आहेत.


‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘जुग-जुग जियो’ सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांनी या शोचा मनभरुन मज्जा घेतली. कलाकांरांनी यांना खूप हसवलं.



भाऊ कदम अनिल कपूर बनला आहे. त्याने अनिल कपूर यांची भूमिका करत त्यांना खूप हसवलं. हा एपिसोड सोमवारी प्रदर्शित होणार आहे.