मुंबई : बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खान यानं काही सोशल मीडिया युजर्स विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकत रितसर तक्रार दाखल केली आहे. अरबाजची प्रतिमा मलिन करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आणि त्याची मॅनेजर म्हणून एकेकाळी काम पाहणाऱ्या दिशा सालियन या दोघांच्याही मृत्यूप्रकरणात अरबाजचं नाव चुकीच्या पद्धतीनं गोवलं गेलं. सध्या ही दोन्ही प्रकरणं तपासाधीन आहेत. अरबाजनं मुंबईतील civil court मध्ये या प्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणारी तक्रार दाखल केली आहे. २८ सप्टेंबरला न्यायालयानं सदर प्रकरणी संबंधितांना नोटीसही बजावल्याचं कळत आहे. 


अरबाजला सुशांत आणि दिशा प्रकरणात सीबीआयनं अनधिकृतरित्या ताब्यात घेतल्याचं सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. त्याचविरोधात त्यानं हे पाऊल उचलत थेट कायद्याचीच मदत घेतली. ज्याइंतर्गत आता सोशल मीडियावरील कोणत्याही संभाव्य माध्यमातून अशा प्रकारचा चुकीचा, प्रतिमा मलीन करणारा आणि अरबाज खान, त्याच्या कुटुंबीयांना चुकीच्या नजरेतून दाखवणारा तपशील प्रसिद्ध न करण्याची विचारणा करण्यात आली आहे. असा तपशील आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. 





 


गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी कलाविश्वातील या आत्महत्या प्रकरणानं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. सीबीआयपासून ते थेट एनसीबीपर्यंत तपास यंत्रणा शक्य त्या सर्व परिंनी निष्कर्ष काढण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी दर दिवशी ही प्रकरणं वेगवेगळ्या वळणांवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.