मुंबई : लग्नसराईचे वारे गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात वाहत आहेत. आता हे वारे आता आणखी दोन सेलिब्रिटींपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशनशिपच्या बऱ्याच चर्चाही पाहायला मिळत आहेत. एअरपोर्टवर त्यांचं एकत्र येणं म्हणू नका किंवा मग एखाद्या फॅशन शो ला हजेरी लावणं म्हणू नका. ते दोघंही चर्चेचा विषय ठरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुविध कारणांनी प्रकाशझोतात असणारी ही जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. 


अरबाज खानसोबतच्या वैवाहिक नात्यातून वेगळं झाल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांच्या रिलेशनशनशिपने सर्वांचच लक्ष वेधलं. 


जाहीरपणे या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांना दुजोरा दिला नाही. पण, आता लवकरच ते आपल्या नात्याची अधकृत घोषणा करणार असल्याचं कळत आहे. 


सूत्रांचा हवाला देत 'फिल्मफेअर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुढच्या वर्षी हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. जाहीरपणे ते दोघंही कधीच आपल्या नात्याविषयी बोलत नसले तरीही त्या दोघांनीही आपल्या नात्याला आता एका नव्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 


एकंदरच बी- टाऊनमध्ये होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता आता, अर्जुन आणि मलायका आता त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.