Entertainment News : काही कलाकार हे त्यांच्या अभिनयाच्या बळावर मोठे होतात तर, काही कलाकार शिफारसी आणि ओळखींच्या बळावर प्रसिद्धीझोतात येतात. काही कलाकारांना मिळणारी प्रेक्षकपसंती ही त्यांच्या दिसण्यावर नव्हे, तर त्यांच्या चित्रपट निवडीवर आणि अर्थातच त्यांच्या कौशल्याच्या बळावर मिळते. यातचलंच एक नाव म्हणजे अर्शद वारसीचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शद वारसी म्हटलं की त्याची खोडकर वृत्ती, त्यानं साकारलेल्या खट्याळ भूमिका आणि अर्थातच त्यानं साकारलेला 'सर्किट' आठवतो. 'भाई... बोलेतो...' असं म्हणत हातात कसलंसं शस्त्र भिरकावत समोरच्याला दटावणारा हा 'सर्किट' सहाय्यक भूमिकांमध्ये अनेकदा दिसला असला तरीही त्याला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम मात्र कमाल आहे. 


Insecure अभिनेत्यांमुळे अर्शदवर आली ती वेळ... 


सहाय्यक भूमिकेत असणारा अर्शदच सगळी लोकप्रियता मिळवेल आणि आपण मात्र मागेच राहू अशा समजुतीमुळं काही Insecure अभिनेत्यांच्या कारणास्तव त्याला चित्रपटांतून काढता पाय घ्यावा लागला. अभिनेत्यांचं नाव न घेता खुद्द अर्शदनंच याचा खुलासा केला. 


मनात अनेक शंका असणाऱ्या कलाकारांमुळं आपण अनेक चित्रपटांना मुकलो, त्यांच्यामुळं चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असं अर्शद म्हणाला. इतकंच नव्हे, तर कलाजगतामध्ये असे एकदोनच अभिनेते आहेत जे सहाय्यक अभिनेत्यांना त्यांच्या ताकदीनं काम करण्याची परवानगी देतात असंही त्यानं स्पष्ट केलं. अर्शदनं केलेला हा खुलासा पाहता कलाविश्वात आता हे Insecure अभिनेते कोण? हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. 


रिअल लाईफ मुन्नाभाई आणि सर्किट... 


खरं सांगावं तर, मी संजूमुळच Munna Bhai MBBS या चित्रपटात काम केला, असंही त्यानं स्पष्ट केलं. संजय दत्तची प्रशंसा करत एक अभिनेता म्हणून तो इतका कमाल आहे की तो मला हवा तसा अभिनय करू देईल याची खात्री होती असंही त्यानं सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : खेड्यापासून शहरापर्यंत जबरदस्त मायलेज देणार Hero Passion Plus; पाहा फिचर्स आणि किंमत 


जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण ज्या भूमिकेमुळं अर्शद प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला त्या Munna Bhai MBBS मध्ये 'सर्किट' साकारण्यापूर्वी त्याच्या मनात बऱ्याच शंका होत्या. राजकुमार हिरानी यांच्यासोबत त्याला काम तर करायचं होतं पण, चित्रपटाच्या यशानंतर आपल्याला प्रेक्षक लक्षात ठेवतील की नाही याची शाश्वती मात्र त्याला नव्हती. सहकलाकारांना न मिळणाऱ्या लोकप्रियतेचा मुद्दा त्याच्या या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवला. 


अर्शदनं त्याला हवी तशीच भूमिका साकारण्यासाठी हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांची परवानगी घेतली आणि पुढे जे काही झालं ते आपण सर्वांनीच चित्रपटातून पाहिलं.