Ayushmann Khuranna Trolled at Last Rites of His Father: काल आयुष्यमान खुरानाच्या वडिलांचे ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन झाले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा (Ayushmann Khurrana Father) पसरली. प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पी. खुराना हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज संपली आणि काल सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनानं सगळीकडेच शोक व्यक्त केला जातो आहे. ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे काल सकाळी चंदीगढ येथे निधन झाले. आयुष्यमान हा आपल्या वडिलांच्या खूप जवळ होता. आयुष्यमान खुराना याचा भाऊ अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurrana) यांच्या एका प्रवक्ता काल ही बातमी जाहीर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो आपल्या बॉलिवूडच्या करिअरचे सर्व श्रेय हे आपल्या वडिलांना देतो. त्याचसोबत त्याच्या वडिलांना त्याला त्याच्या नावाचे स्पिलिंगही बदलायला सांगितले होते. यामुळे त्याच्या वडिलांना विश्वास होता की आयुष्यमानला एक ना एक दिवस यश नक्की मिळेल. ज्योतिषाचार्य पी. खुराना यांच्यावर आज दुपारी चंढीगढ येथे अंत्यसंस्कार (Last Rites) करण्यात आले. काल सकाळी मोहोली येथे त्यांचे निधन झाले होते. फोर्टिस हॉस्पिटल येथे त्यांना भरती करण्यात आले होते. आज मणिमाजरा शमशान घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 


हेही वाचा - अभिनेता आयुष्यमान खुरानाला पितृशोक! ज्योतिषाचार्य पी. खुराना यांचे निधन


यावेळी आयुष्यमान खुरानाला ट्रोलर्सनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''अरे हा असा कसा मुलगा आहे जो आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी चक्का गॉगेल घालून आहे.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''आपल्या वडिलांच्या अंतयात्रेला गॉगल घालणं जरूरी आहे का?'' तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''हे बॉलिवूडवाले तर आपल्या वडिलांच्या मयतेलाही स्टाईलमध्ये येतात, काय म्हणावं यांना?'' तर काही युझर्सनी त्यांना त्यांची प्रायव्हसी घेऊ दे असं म्हटलं आहे. यावेळी बॉलिवूडची स्टाईल, स्टेटस आडवं आलं आणि ट्रोलर्सनी आयुष्यमान खूप ऐकवलं आहे. 


हेही वाचा - जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विरल भयानीनं पी. खुराना यांच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये आयुष्यमान आणि अपारशक्ती त्यांच्या वडिलांचे पार्थिव घेऊन जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर दोघांनी यावेळी गॉगल घातले आहेत. परंतु यामुळे ते दोघंही ट्रोल झाले आहेत. परंतु यावेळी ट्रोलर्सचा निशाणा हा जास्त करून आयुष्यमानवरतीच होता. आयुष्यमान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच अनेक चित्रपट हे लोकप्रिय आहेत. आयुष्यमानचा भाऊ अपारशक्तीही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.