जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?

Rihanna Maternity Shoot: जगप्रसिद्ध गायिका रिहाना ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. यावेळी तिनं आपलं मेटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) सोशल मीडियावर पोस्ट केलं आहेय या शूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. परंतु तिच्या या न्यूड मेटर्निटी शूटनं सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 20, 2023, 06:22 PM IST
जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?  title=
(Photo : Rihanna | Instagram)

Rihanna Maternity Shoot: मेटर्निटी फोटोशूटचं आजकाल सगळ्यांनाच वावडं आहे. त्यातून हे फोटोशूट आपल्या परंपरेला धरून नाही असेही मतप्रवाह सोशल मीडियावरून फिरायला लागतात. सेलिब्रेटींचे मेटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर (Maternity Photoshoot) तूफान व्हायरल होत असते. त्यातून आता सर्वसामान्य लोकंही सोशल मीडिया वापरत असल्यानं तुमच्या आमच्यासारखी साधी माणसंही मेटर्निटी फोटोशूट करताना दिसतात.

यावेळी अशाच एका दिग्गज सेलिब्रेटीचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. जगप्रसिद्ध गायिका रिहानाचं मेटर्निटी फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी तिच्या फोटोशूटनं तिच्या चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वळवलं आहे. यावेळी तिचं हे बोल्ड (Rihanna Bold Photoshoot) फोटोशूट चर्चेत आहे. (rihanna maternity photoshoot shows her baby bump photos goes viral)

आपल्या दुसऱ्या प्रेग्नंन्सीचं तिचं हे फोटोशूट होतं. यावेळी तिनं आपल्या पहिल्या प्रेग्नंन्सीबद्दल लिहिताना सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''हे फोटोशूट माझ्या पहिल्या गरोदरपणाच्या सन्मानार्थ आहे. माझ्या या गर्भानं माझ्या शरीरात जादू केली आहे. माझ्या मातृत्वाला मी जवळ घेतलं आहे. माझ्या पोटातल्या बाळाला कल्पना नसेल की मी त्याच्याबद्दल किती उत्सुक होते आणि त्याला आपल्या आईबद्दल किती वेड आहे याची त्याला कल्पना नसेल. अशा तऱ्हेने तिनं काहीसं फोटोशूट केलं आहे.''

हेही वाचा - ही Dolly Singh आहे तरी कोण? कान्स महोत्सवात जिच्यावर खिळल्या सगळ्यांच्याच नजरा

सध्या तिचं हे फोटोशूट सगळीकडेच व्हायरल होतं आहे. तिच्या या फोटोशूटनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. रिहानानं यावेळी न्यूड मेटर्निटी फोटोशूट केलं आहे. तिनं गोल्डन चेनची ब्रा आणि ब्लॅक कलरची बिकीनी बॉटम घातली होती. यावेळी तिनं संपुर्ण न्यूड मेटर्निटी शूट केलं असलं तरी तिनं हाट हिल्स घालून आपलं संपुर्ण मेटर्निटी शूट केलं होतं. यावेळी तिच्या या फोटोशूटनं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. तिच्या या फोटोशूटला 1 कोटी युझर्ननी लाईक केलं आहे. 35 वर्षीय रिहाना (Rihanna Instagram) ही गेली अनेक वर्षे लाईमलाईटमध्ये आहे. तिचे जगभरात प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. इन्टाग्रामवरील ती सर्वात लोकप्रिय अशी सेलिब्रेटी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिचे इन्टाग्रामवर 15 कोटी फॉलोवर्स आहे. तिच्या गाण्यांचा जगभरात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. तिची गाणीही प्रचंड लोकप्रिय आहेत. रिहाना ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून तिनं आपलं हे फोटोशूट इन्टाग्रामवर शेअर केलं आहे. रहिना A$AP Rocky नावाच्या रॅपरला डेट करते आहे. त्यांनी 2022 साली एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आता रिहाना दुसऱ्यांदा गरोदर आहे.