मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी कलाविश्वाचा एक काळ खऱ्या अर्थाने गाजवला. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कायमच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला केंद्रस्थानी ठेवलं. विविध चित्रपटांच्या निमित्ताने त्यांना अनेकदा विविध ठिकाणीही जावं लागलं होतं., आजही जावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रीकरणाच्या निमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या बच्चन यांना यावेळी काही चाहते भेटत असतात. या साऱ्यामध्ये कुटुंबातील मंडळीही त्यांच्यासोबत विविध रुपांमध्ये असतात. खरं वाटत नसेल, तर खुद्द अमिताभ बच्चन यांची सोशल मीडिया पोस्ट पाहून याचा अंदाज येत आहे. 


बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं आहे. हे पत्र त्यांना एका खास आणि हृदयाच्या अगदी जवळ असणाऱ्या एका व्यक्तीने लिहिलं आहे. जे पाहून तेसुद्धा भावूक झाले. या व्यक्तीला बिग बींपासून दूर राहणं अनेकदा कठीण वाटत असलं तरीही त्यांच्या अनुपस्थितीत आपणच कुटुंबाची जबाबदारी घेऊ अशी हमीही त्या व्यक्तीकडून या महानायकाला देण्यात येते. ही व्यक्ती म्हणजे अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


सध्याच्या घडीलाही अभिषेक कुटुंबाची जबाबदारी घेतो. पण, त्याची ही वृत्ती बालपणीपासूनच असल्याचं त्याने अनेक वर्षांपूर्वी आपल्या वडिलांसाठी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रातून पाहायला मिळते. पत्रातील हस्ताक्षर आणि ओळी पाहता अभिषेकने त्याच्या शालेय जीवनात असतेवेळी हे पत्र लिहिल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रीकरणाच्या निमित्ताने आपल्यापासून दूर असणाऱ्या वडिलांसाठी तुम्ही लवकरच घरी परत याल, असा विश्वास देत अभिषेकने ते पत्र लिहिलं होतं. 




'मी तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करतो. तो देवही आपल्या प्रार्थना ऐकत आहे', असं लिहिणाऱ्या अभिषेकने आपल्याला वडिलांची आठवण येत असल्याचंही या पत्रातून लिहिलं होतं. मुख्य म्हणजे, 'मी केव्हातरी खोडकरपणाही करतो' हेसुद्धा त्याने मोठ्या निरागसपणे या पत्राच्या शेवटी लिहिलं होतं. आपल्या मुलाने अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं हे पत्र बिग बींसाठी अतिशय खास आहेच. पण, त्यांच्या चाहत्यांनाही वडील- मुलाचं हे सुरेख नातं भावलं आहे.