मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस वेगात पसरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ९७ वर्षीय बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. याबाबत सोशल मीडियावरुन माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीही संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप कुमार यांनी ट्विट करत, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मी पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. मला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी, सायरा याबाबत पूर्ण लक्ष ठेवत असल्याचं सांगितलंय. 



कोरोनामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडवर मोठा परिणाम झाला आहे. सलमान खान, हृतिक रोशनने आंतरराष्ट्रीय टूर रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे अक्षय कुमारने त्याच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली आहे. अनेक चित्रपट आणि अनेक शोचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. IMPPA, FWICE, IFTDA, WIFPA, IFPTC यांसारख्या फिल्म बॉडिजने कोरोनामुळे शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेता क्रिस्तोफर हिव्ह्यूला (Kristofer Hivju) कोरोनाची लागण झाली आहे. याआधी अभिनेता टॉम हँक्स (Tom Hanks) आणि पत्नी रीता विल्सन (Rita Wilson), ओल्गा कुरिलेन्को (Olga Kurylenko) यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या कलाकारांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.


भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२६वर पोहचली आहे.