COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Aamir Raza Husain Death : बॉलिवूडमधून आणखी एकदा एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता इतकंच काय तर थिएटर आर्टिस्ट आमिर रझा हुसेन यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 66 व्या वर्षी आमिर रझा हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. काल 3 जुन रोजी जगाचा निरोप घेतला. 


आमिर रजा हुसेन यांनी बाहुबली आणि आरआरआर या चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटसृष्टीला क्रिएटिव्ही प्रोडक्शन दिलं आहे. त्यांच्या या चित्रपटाचं नाव हे ‘द फिफ्टी डे वॉर’ कारगिल असे आहे. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. याशिवाय आमिर रजा हुसेन हे 'कारगिल' आणि 'लिजेंड्स ऑफ राम' या सारख्या मेगा शोसाठी ओळखले जातात. 


आमिर रजा हुसेन यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म लखनऊमध्ये मुमताज हुसैन आणि कनीज मेहदा यांच्या घरी 6 जानेवारी 1957 साली झाला. हुसेन हे एकुलते एक होते. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे आई-वडील दिल्लीला आले होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला.  हुसेन यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. त्या काळात ते कॉलेजच्या नाटकांमध्ये सहभागी व्हायचे. इतकंच नाही तर त्यांनी जॉय मायकल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च या दिग्दर्शकांसोबतही काम केलं.


हेही वाचा : घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..."


आमिर रजा हुसेन कधी BJP ची सदस्य देखील होते. त्यांनी दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष म्हणून काम केले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर जुलै 2013 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. थिएटरमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनी 1993 मध्ये विराट तलवारसोबत लग्न केले होते. त्या देखील व्यवसायाने अभिनेत्री होती. त्यांची भेट 1987 साली झाली. त्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकत होत्या. लग्नानंतर त्यांना अनीज सुकैना आणि गुलाम अली अब्बास अशी दोन मुले झाली. आमिर हुसेन यांच्या अखेरच्या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर त्यांचा अखेरचा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला असून त्याचं नाव 'खुबसूरत' असं आहे. या चित्रपटात सोनम कपूर आणि फवाद यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.