घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..."

Hemangi Kavi : हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर बोलत असते. दरम्यान, हेमांगी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिनं नवऱ्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वटपोर्णिमेची पूजा करतानाचे फोटो शेअर करण्यावरून चक्क सवाल केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2023, 02:59 PM IST
घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..." title=
(Photo Credit : Hemangi Kavi Instagram)

Hemangi Kavi : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. हेमांगी नेहमीच अनेक गोष्टींवर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. नेहमीच काही नाही काही बोलणारी हेमांगी आता पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. हेमांगीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कालच्या वटपौर्णिमे विषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीनं तिच्या पतीविषयी काही सांगितलं आहे. 

हेमांगीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिचा एक गजरा लावलेला फोटो शेअर केला आहे तर त्यासोबत वटपोर्णिमेची पूजा करत असलेल्या काही महिलांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत हेमांगी म्हणाली, "काल वटपौर्णिमा होती. परवा रात्री शूटिंगला लेट पॅकअप झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसानं वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे 2 फोटो पाठवले होते. मी रिप्लाय करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे ही संपूर्ण घटना सांगत हेमांगी म्हणाली, "थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ते फोटो कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा बिस्किट खाल्लंय. त्यावर त्याने अगं, आज वटपौर्णिमाना, तू ते काही बाही लिहितेस ना सोशल मीडियावर. त्यासाठी रेफर्न्स म्हणून फोटो पाठवले. पोस्टच्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!"

हेही वाचा : Kaushal साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, अशी करतोय तयारी 

पुढे पतीला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत हेमांगी म्हणाली, "मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “हॅपी वटपौर्णिमा!” हेमांगीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.