बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमधून पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तब्बल 14 वर्षांनंतर फरदीन खान नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमधून पुनरागमन केलं. दरम्यान फरदीन खानचा घटस्फोट झाला असून, तो आपल्या कुटुंबासोबत राहत नाही अशी चर्चा रंगली आहे. नुकतंच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत फरदीन खानने आपण मुलांसोबत राहत नसून त्यांची फार आठवण येत असल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या करिअरला नव्याने सुरुवात करणारा फरदीन खान आता मुंबईत स्थायिक आहे. त्याची मुलं मात्र लंडनमध्ये आहेत. यामुळे त्याने त्याची पत्नी नताशा माधवानीला घटस्फोट दिल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. फरदीन खानने आपल्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करण्यास नकार दिला. यावेळी त्याने आपली मुलं आणि त्यांच्यासह वेळ घालवणं याची फार आठवण येत असल्याचं सांगितलं. 


फरदीन खानने मुलाखतीत सांगितलं की, "हे फार सोपं नाही. ते माझ्यापासून दूर का आहेत याच्या मला जायचं नाही. पण हो, हे फार सहज नाही. मला त्यांची फार आठणव येत. दर चार ते सहा आठवड्यांनी मी त्यांना भेटतो. आम्ही रोज व्हिडीओ कॉलवरुन बोलतो. पण ते माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीत, त्यांना मोठं होताना न पाहणं, त्यांच्या निवडणूक प्रक्रियेचा भाग न होणं, त्यांची ओळख निर्माण करण्यात मदत करणं या सर्वांबद्दल फार वाईट वाटतं. माझी मुलं चित्र काढतात. मी त्यांनी काढलेली चित्रं मुंबईतील घराच्या भिंतीवर लावली आहेत".


मुलांपासून दूर राहत असल्याची आपली खंत व्यक्त करताना फरदीन म्हणाला की, "मी त्यांच्या मिठ्या, चुंबनं यांची आठवण येते. लक्ष विचलित करण्यासाठी मी सतत काम करत असतो. पण जेव्हा कधी ते मुंबईत येतात तेव्हा मी सर्व काम बाजूला ठेवतो आणि त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध असतो".


फरदीन खानने अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीसोबत लग्न केलं आहे. त्यांना मुलगी डायनी आणि मुलगा अझारीउ अशी दोन मुलं आहेत. फरदीन खान शेवटचा 'खेल खेल में' मध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर आणि इतरांसोबत दिसला होता.