मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... व्यक्त होण्यापासून ते मिळवण्यापर्यंत सारंकाही सेम असतं, असंच शिबानी दांडेकरची सोशल मीडियावरील नवीन पोस्ट पाहून म्हणावं लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याविषयी खुलेपणाने सर्वांसमोर व्यक्त होणाऱ्या शिबानी दांडेकर आणि अभनेता फरहान अख्तर यांनी आपल्या रिलेशनशिपची ग्वाही जिली. त्यानंतर विविध कार्यक्रमांनाही ते एकत्र दिसू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिबानी आणि फरहानचं हे प्रेम आता बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, त्यांचं नातं सर्वांचच लक्ष वेधत आहे. फरहानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकताच शिबानीने सोशल मीडियावर एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्या दोघांच्या केमिस्ट्रीसोबत लक्ष वेधतोय तो म्हणते फरहानचा टॅट्टू. 


शिबानी स्वत:सुद्धा त्याच्या या टॅट्टूच्या प्रेमात असून फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ही बाब स्पष्ट केली आहे. फरहाला आपल्या मनाच्या अधिक जवळचा व्यक्ती म्हणत त्याला ४५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत तिने हा दिवस आणखी खास केला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबानी आणि फरहान यांनी गुपचूप साखरपुडा आवरला असून, यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात ते लग्नाच्या बेडित अडकणार असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे यंदाही कलाविश्वात लग्नसराईचेच वारे वाहणार असल्याचच सध्यातरी कळत आहे. दरम्यान, आता या लग्नाविषयीची अधिकृत माहिली खुद्द शिबानी आणि फरहान कधी जाहीर करणार याकडेच चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.