लेकीला इंग्रजी गाणं गाताना पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर
नुकताच एका अभिनेत्याने आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाये. ज्यात स्टार बाप-लेकीची ही जोडी गाणं गाताना दिसतेयं.
मुंबई : कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात.. कधी इंस्टाग्रामवरील पोस्ट , तर कधी आगामी सिनेमा किंवा प्रोजेक्टची घोषणा ते सोशल मीडियाद्वारे करताना दिसतात. एवढंच काय तर आपल्या डेली लाईफमधील अपडेट्स देखील ते इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात..
नुकताच एका अभिनेत्याने आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाये. ज्यात स्टार बाप-लेकीची ही जोडी गाणं गाताना दिसतेयं.
अभिनेता शरद केळकरने मुलगी केशासोबतचा हा गोड व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात दोघांनी इंग्लिश गाणं गायला सुरुवात केली..आणि यात विशेष म्हणजे केशा अगदी उत्तम रित्या हे इंग्लिश गाणं गाताना दिसतेय..त्यात तिचा बबली अंदाज देखील साऱ्यांचच लक्षवेधून घेणारा ठरतोयं.
ही पोस्ट शेअर करत शरदने छोट्या केशाच्या अॅक्टीव्ह अंदाजाच कौतुक केलंय.. शरदने हा व्हिडिओ शेअर करत "लेकीला इंग्रजी गाणं गाताना पाहून डोळ्यात आनंदाश्रू" आल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
शरद नेहमीच केशासोबत धम्माल करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्यामुळे स्टार किड केशाचं ही फॅन फोलोविंग तयार झालंय. तिचे व्हिडिओज देखील कमलीची पसंती मिळताना दिसून येते.