मुंबई : अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याचं वेगळेपण सिद्ध करुन जातो. मग ते त्याचे चित्रपट असो किंवा मग एखादं स्टाईल स्टेटमेंट. सध्या बी टाऊनचा हा ग्रीक ग़ॉड चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या आणि सबा आझाद हिच्या कथित अफेअरमुळं. (Hrithik Roshan saba azad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबा आणि हृतिक यांनी मागील काही दिवसांपासून त्यांच्या असणाऱ्या मैत्री आणि त्याहूनही प्रेमाच्या नात्याला उघडपणे सर्वांसमोर आणण्यास सुरुवात केली आहे. 


एखादी डिनर डेट असो किंवा मग हृतिकच्या कुटुंबासोबत खास वेळ घालवणं असो, आता त्याला प्रत्येक ठिकाणी सबाची साथ मिळू लागली आहे. 


मुख्य म्हणजे आता सबासुद्धा रोशन कुटुंबामध्ये चांगली रुळू लागली आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशी तिचं एक सुरेख नातं आकारास येत असल्याचं इथे पाहायला मिळत आहे.


आता हेच बघा ना, सबाला घराची आठवण आल्यासारखं वाटताच हृतिक नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील काही मंडळींनी तिची काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. 


हृतिकच्या घरातून तिला घरचं जेवण पाठवण्यात आलं. यामध्ये घरच्या घरी तयार केलेला पिझ्झा, पास्ता आणि इतर पदार्थही होते. सबानं इन्स्टा स्टोरीमध्ये या मंडळींचे आभारही मानले. 


मुळात आता कुटुंबाच्या इतकी जवळ असणारी सबा त्यांच्या घरची सून केव्हा होते, असाच प्रश्न चाहते करु लागले आहेत. 



हृतिकसोबतच्या नात्यापूर्वी सबाचं नाव नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांचा मुलगा इमाद याच्याशी जोडलं गेलं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Saba Azad (@sabazad)


किंबहुना इमाद आणि सबा बरीच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. पण, काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. पण, यांची मैत्री मात्र कायम राहिली.