Hritik Roshan and Saba Azad: सध्या बॉलीवूडमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक सेलिब्रेटींच्या डेटिंगच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातील एक जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद ही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक रोशन बॉलीवूड क्विन कंगना राणौतला डेट करत असल्याच्या बातम्या कोण उधाण आलं होतं. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या. परंतु त्यांचं नातं टिकलं नाही. कित्येक दिवस सिंगल असलेला हृतिक रोशन आता सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 


त्यांच्या रिलेशनमुळे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. करण जोहरच्या बर्थडे पार्टीनंतर ते दोघं अनेकदा स्पॉट झाले आहेत. नुकतेच हृतिक रोशनने रक्षाबंधनाचे खास क्षण आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून शेअर केले आहेत. 


हृतिकने आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये हृतिक आपल्या भावा-बहिणींसोबत दिसतो आहे. या फोटोंत हृतिकने आपला एक जुना फोटोही शेअर केला आहे. हा फोटो सव्वीस वर्षांपुर्वीचा म्हणजे 1996 मधला आहे. हा फोटो शेअर करत हृतिकने रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 


सोशल मीडियावर हृतिकने एक नवा फोटो शेअर केलाय ज्यात त्याची गर्लफेंड सबा आझादचे नावं दिसतं आहे. सबाने हा फोटो काढण्यासाठी विशेष मदत केली आहे. त्यामुळे सबा आझाद हृतिकच्या घरी पोहचली होती. यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की गर्लफ्रेंड सबा आझाद रक्षाबंधनासाठी हृतिकच्या घरी कशी काय पोहोचली.


तर यंदाच्या रक्षाबंधनला सोशल मीडियावर रक्षाबंधनाचा जुना आणि नवीन फोटो पोस्ट करण्याची आयडिया हृतिकला सबा आझादने दिली. आपला फोटो शेअर करताना हृतिकने सबा आझादला क्रेडिट दिले आहे. त्याच्या या कॅप्शनमुळे सध्या चाहत्यांमध्ये सबा आझाद हृतिक रोशनच्या घरी पोहचल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 


हृतिक आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसतात. ते दोघं एकमेकांनी डेट करत आहेत परंतु त्यांनी मात्र अद्याप याविषयी स्वतःहून खुलासा केलेला नाही. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. त्याचसोबतच खुद्द हृतिकची पहिली पत्नी सुझेनही त्यांच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत असते. 



हृतिक रोशन लवकरच 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत हृतिकची जोडी दिसणार आहे. 'फाइटर' हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. 'फायटर' व्यतिरिक्त हृतिक विक्रम वेधा आणि क्रिश 4 या चित्रपटांतूनही दिसणार आहे.