मुंबई : यश स्टारर 'KGF Chapter 2' सुपर डूपर हिट ठरलाय. चित्रपटाला रिलीज होऊन सहा आठवडे उलटले असले तरी हा चित्रपट तूफान कमाई करतोय. या चित्रपटाच्या यशानंतर आता 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात आता अभिनेता संजय दत्त नंतर आणखीण एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'KGF Chapter 3' कधी येणार अशी चाहत्यांना उत्सुकता लागलीय. अशात 'केजीएफ'च्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी तिचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटासाठी त्याला संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. 


 निर्माता काय म्हणाला ?


'केजीएफ'च्या निर्मात्यांनी या चर्चेवर मौन सोडले आहे.  'KGF' चे प्रोडक्शन हाऊस होमबेल फिल्म्सचे सह-संस्थापक विजय यांनी Asianet Newsable शी केलेल्या संभाषणात हृतिक रोशनच्या कास्टिंगबद्दल सांगितले की "KGF: Chapter 3 यावर्षी येणार नाही. प्रशांत नील सध्या सालारमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी यश त्याच्या पुढच्या चित्रपटाचीही घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 


तर पूढे ते म्हणाले, आम्ही सर्वजण एकत्र येऊन KGF 3 वर काम करण्याची वाट पाहत आहोत. आता आमच्याकडे निश्चित तारीख नाही आहे. पण "जेव्हा आम्ही तारखा फायनल करू, तेव्हा स्टारकास्टचाही विचार करू. त्यानंतरच बाकीच्या कलाकारांना फायनल करू. यासोबतच, चित्रपटासाठी कोणाकडे वेळ आहे हेही बघायला हवे. काम सुरू केल्यावर सर्व गोष्टी कळतीलचं असेही ते म्हणाले.  


दरम्यान अद्याप तरी हृतिक रोशनच्या नावाची फक्त चर्चा आहे. ज्यावेळेस KGF: Chapter 3 शुटींग सुरु होईल त्यावेळेस हृतिक रोशनच्या नावावर शिक्कामोर्तब होतो की नाही हे कळणार आहे.