मुंबई : बॉलवूडमधला एक असा कलाकार ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अगदी हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्ही मालिकांपासून चित्रपटांपर्यंतच्या प्रवासामध्ये या कलाकाराने स्ट्रगल, संघर्ष यांसारख्या अनेक गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडणारा अभिनेता इरफान खान आज त्याचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान खाननं संपूर्ण नाव शाहबजादे इरफान अली खान. इरफानचा जन्म जयपूरमधल्या आमेरओड भागात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इरफानने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहत, दिल्लीत पाऊल ठेवलं आणि नॅशनल ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण त्याच दरम्यान त्याच्या वडिलाचं निधन झालं होतं.अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करताना याच दरम्यान त्याची ओळख सुपता सिकंदरशी झाली. त्यानंतर त्या दोघांनी विवाह केला.



मोठ्या संघर्षानंतर इरफानला 'सलाम बॉम्बे' नावाच्या एका चित्रपटात छोटासं काम मिळालं. त्यानंतर मात्र त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. एकामागे एक जबरदस्त चित्रपट देत इरफानने इंडस्ट्रीत आपली खास जागा बनवली.


बी टाऊननंतर इरफानने हॉलिवूडमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अ मायटी हार्ट, स्लमडॉग मिलिनियर, द अमेझिंग स्पायडर मॅन यांसारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. 


२०११ मध्ये इरफानला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.



काही वर्षांपूर्वी इरफानने कॅन्सरशी यशस्वी झुंज देत पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.