मुंबई : न्यूरोएंडोक्राइन ट्युमर या आजाराशी झुंज देणाऱ्या अभिनेता इरफान खान याच्या चांगल्या प्रकृतीसाठीच प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, काही खासगी कामासाठी इरफान भारतात परतला होता. खरंतर फार कमी लोकांना याविषयीची माहिती होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्पॉटबॉयई'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुकत्याच मायदेश परतलेल्या इरफानने नाशिक येतील त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात ब्राह्मणांसोबत पूजाअर्चाही केली. सूत्रांचा हवाला देत या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार काही खासगी कामांच्या निमित्ताने तो अगदी कमी वेळासाठी भारतात परतला होता. ज्यानंतर तो पुन्हा एकदा लंडनला रवाना झाला. 


सध्या त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरीही डॉक्टरांनी अद्यापही त्याला काळजी घेण्यासच सांगितल्यामुळे इरफान प्रकृतीवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहे. 


पुढच्या वर्षी मार्च महिन्याच्या सुमारास तो भारतात परतण्याची चिन्हं आहेत. किंबहुना तो येत्या काळात चित्रपटांच्या चित्रीकरणावरही लक्ष केंद्रित करु शकणार असल्याचंही कळत आहे. तेव्हा आता इरफान कधी परततो याकडेच चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.