मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांकडूनही कलाकारांच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत असतात. आता एका बॉलिवूड कलाकाराने त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. पण या कलाकाराला ओळखणं मात्र काहीसं कठिण आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोत तो चक्क दोन पोनी घातलेल्या हेअर स्टाईलमध्ये दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये आईच्या कडेवर, दोन पोनी घातलेला हा अभिनेता आहे कार्तिक आर्यन... कार्तिकने स्वत: सोशल मीडियावर हा फोटो शेअर केलाय. त्याने हा फोटो शेअर करण्यामागे कारणही तसंच खास आहे...कार्तिकने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोसोबत त्याने, 'माझ्या आईला, माझ्या आवडत्या हेअरस्टायलिस्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा' असं म्हणत फोटो शेअर केलाय.



कार्तिकच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून त्याच्या फोटोला पसंतीही मिळतेय. कार्तिक लवकरच 'लव आज कल' चित्रपटातून भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री सारा अली खानसोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटााबाबत चर्चा सुरु होती. अखेर आज या 'लव आज कल'चं पोस्टर रिलीज झालं आहे. येत्या शुक्रवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.



याशिवाय, कार्तिक 'दोस्ताना २', 'भूल भूलैया २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.