मुंबई : कधी-कधी आपल्याला आपली मेहनत घेवून कुठे दुसरीकडे जायचं असतं, मात्र आपलं नशीब आपल्याला कुठेतरी तिसरीकडेच घेऊन जातं. पाकिस्तानातून भारतात आलेल्या मॅकमोहनचीही अशीच एक कथा आहे, जो क्रिकेटपटू बनण्यासाठी आला पण अभिनेता बनला.  'शोले' चित्रपटात सांभाची व्यक्तिरेखा साकारून मॅक मोहन यांना प्रसिद्धी मिळाली. महत्त्वाचं म्हणजे ते सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांचे मामा होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅक मोहन यांचं खरं नाव मोहन माखीजानी आहे. त्यांचे वडील भारतातील ब्रिटीश सैन्यात कर्नल होते. मॅक मोहन यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि त्यांना क्रिकेटपटू व्हायचं होतं. १९४०मध्ये वडीलांची कराचीमधून लखनौला बदली झाली, त्यानंतर मॅक मोहन यांनी लखनौमध्ये शिक्षण घेतल.


बनायचं होतं प्रोफेशनल क्रिकेटपटू  
एका मुलाखतीत मॅकमोहन यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडूनही खेळल्याचं सांगितलं. मग अशी वेळ आली जेव्हा त्यांनी ठरवले की, आता त्यांना एक क्रिकेटपटू बनायचंच आहे. त्या काळात क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण फक्त मुंबईतच देण्यात येत होतं, त्यानंतर १९५२मध्ये ते मुंबईत आले, मात्र मुंबईत आल्यावर जेव्हा त्यांनी नाट्यगृह पाहिलं तेव्हा त्यांची ईच्छा नाटकावर गेली.


शोलेचा सांभा म्हणून मिळाली प्रसिद्धी
मॅक मोहन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1964 मध्ये 'हकीकत' या चित्रपटातून केली होती. आपल्या 46 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 175 चित्रपटांत काम केलं. त्यांना त्याच्या काळातील सर्व बड्या चित्रपट दिग्दर्शकांनी काम दिलं होतं. 'डॉन', 'कर्झ', 'सत्ते पे सट्टा', 'काला पत्थर', 'रफू चक्कर', 'शान' आणि 'शोले' या चित्रपटांमधील त्यांच्या कामांचे कौतुक झालं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच चित्रपटांत काम केलं.


नोव्हेंबर २०१० मध्ये जेव्हा मॉक मोहन 'अतिथ तुम कब जाओगे' चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले होते तेव्हा त्यांची तब्येत ढासळली. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्या फुफ्फुसात ट्यूमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांच्यावर दीर्घ उपचार केले परंतु त्यांची प्रकृती खालावत चालली होती. एक वर्षानंतर, 10 मे 2010 रोजी मॅक मोहन यांनी जगाला कायमचा निरोप दिला.