Madhuri Dixit Old Video: बॉलिवूड अभिनेत्री माधूरी दीक्षितचं सौंदर्य आपल्या सर्वानाच (Beautiful Madhuri Dixit) मोहात पाडतं. माधुरी दीक्षितनं गेल्या अनेक वर्षांत आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यश मिळवलं आहे. तिचं सौंदर्य, तिचा अभिनय, तिचं नृत्य आणि तिची प्रत्येक (Madhuri Dixit Face Reading Video) अदाकारी तिच्या चाहत्यांना मोहित पाडते. आजही तिच्या नृत्याकडे आणि अभिनयाकडे पाहत अनेक होतकरू तरूणी प्रेरणा घेताना दिसत आहेत. आज अनेक रिएलिटी शोजमधून तिनं आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन कायम ठेवले आहे. 90 च्या दशकात माधूरी दीक्षितचं नावं हे सर्वाधिक गाजलेले होते. त्याचसोबतच तेव्हापासून ते आजपर्यंत माधूरी दीक्षित ही सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच परंतु ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही आहे. माधूरी दीक्षित सगळ्या वयाच्या तरूण-तरूणींना मोहित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधूरीचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हिडीओ (Madhuri Dixit Viral Video) व्हायरल होत असतात. आता सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की एक फेस रिडर माधूरीचा चेहरा पाहून तिचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल की माधुरीचं सौंदर्य पाहून चक्क त्या फेस रिडरचे संपुर्ण भविष्य खरे ठरले आहे. 


हा व्हायरल होणारा व्हिडीओ हा 21 वर्षे जुना आहे. या व्हिडीओत माधुरी एका सोफ्यावर बसलेली दिसते आहे आणि माधूरी निळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. हा एका जुन्या शोमधला व्हिडीओ आहे. सोनी टीव्हीवर 'कहीं ना कहीं कोई है' (Kahin Na Kahi Koi Hai) नावाचा शो प्रसारित व्हायचा त्या शोमधील हा एक प्रसंग सध्या व्हायरल होतो आहे. या शोमध्ये माधूरी दीक्षितनं सहभाग घेतला आहे.  


या व्हिडीओत माधूरी त्या फेस रिडर महिलेला विचारते की, तुम्हाला लोकांचं फेस रिडींग करता येते, तुम्ही लोकांचे भविष्य सांगू शकता? तर त्यावर त्या म्हणतात की, मला थोड्याफार प्रमाणातच हे जमते. परंतु मी सांगू शकते. त्यावर माधूरी म्हणते की मग तुम्ही माझंही भाविष्य सांगाल? तेव्हा त्या तिचं भविष्य सांगायला सुरूवात करतात. माधूरीच्या समोर ती महिला म्हणते की, तू इतकी भाग्यशाली आहेस की साक्षात भाग्य हे तुझ्यासमोर येऊन हात जोडते. तू साक्षात प्रेमाची मुर्ती आहेस. हे सगळं ऐकून माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे त्या महिला माधूरीला म्हणतात, तू नेहमी सुखी राहशील आणि अक्षरक्ष: माधूरी भावूक होते. यावर माधूरी खूप खुश होते आणि म्हणते तुम्ही इतके चांगले शब्द माझ्यासाठी काढलेत मला खरंच खूप आनंद झाला.