मुंबई : कोणत्याही गोष्टीला अधिक प्रभावीपणे आणि अतिशय मोजक्या वेळात मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवायचं असल्यास एका माध्यमाचा वापर केला जातो. हे माध्यम असतं, जाहिरातीचं. अनेकदा या माध्यमानं काही गोष्टींमध्ये स्वातंत्र्य घेत अशा संकल्पना मांडल्या ज्यांची जितकी चर्चा झाली, तितकेच वादही झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आणि मॉडेस मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांची एक 31 वर्षे जुनी जाहिरातही याचीच प्रचिती देते. 


Tuff shoe च्या जाहिरातीसाठी मिलिंद आणि मधू या दोघांनीही न्यूड फोटोशूट केलं होतं. इथं मधुच्या गळ्याभोवती एक अजगर आणि पायात शूज इतकंच काही या दोघांनीही फोटोशूटसाठी वापरलं होतं. 


इतकी वर्षे उलटूनही ही जाहिरात तितकीच चर्चेत असते. मुळात ही जाहिरात आणि ती साकारणारी कंपनी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात आले, पण पुढे त्यांच्यावर कोणताही ठपका लागला नाही. 


14 वर्षे हा संघर्ष न्यायालयात सुरु होता. एव्हरग्रीन मिलिंद ज्या मॉडेलसोबत इथं झळकला होता, तिचं नाव मधू सप्रे. 


जाहिरातीसाठी या दोघांनाही न्यूड होत कॅमेरासमोर यावं लागलं होतं. असं म्हणतात की त्यावेळी मिलिंद आणि मधू रिलेशनशिपमध्ये होते. 



परिणामी त्यांना या जाहिरातीसाठी सहजपणे पोझ देणं शक्य झालं होतं. 


मिलिंदचा फिटनेस, मधुच्या मादक अदा हे सारंकाही या फोटोंमध्ये टीपण्यात आलं होतं.