मुंबई : प्रत्येक माणसात देव दडलेला आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येक माणसाचं ठाऊक नाही, पण कलाजगतामध्ये एका कलाकारामध्ये खरंच देव दडला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, हा अभिनेता भूतकाळही सोबतच घेऊन जातो आणि जगण्याची नवी उमेद अनेकांना देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. जीवनात स्वत:ची ओळख करु पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच अभिनेता मिथुन दा (Mithun Chakraborty) म्हणजे आदर्श. आज ते ज्या ठिकाणी आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला आहे. मिथुन दांनी नक्षलवाद विरोधी आंदोलनातही सहभाग घेतला होता. 


स्वप्नपूर्तीसाठी घर सोडून निघालेल्या या अभिनेत्यानं अनेकदा पाण्याची टाकी, एखादं उद्यान अशा ठिकाणीही स्वत:साठी आसरा शोधला. दिवस बदलले, गरिबी दूर गेली आणि हळुहळू त्यांना श्रीमंतीचा आशीर्वदा मिळू लागला. भरभराट होऊ लागली.


वयाच्या 72 व्या वर्षीसुद्धा त्यांचा दानशूर स्वभाव तसुभरही बदलला नाही. हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले मिथुन दा कधीच गरजवंतांची मदत करण्यापासून मागे येत नाहीत. कोणीही गरजू त्यांच्या घरातून रिकाम्या हातानं आणि निराश चेहऱ्यानं परतत नाही, म्हणूनच की काय त्यांना 'गरीबांचा मसिहा'सुद्धा म्हटलं जातं. 



कोट्यवधींच्या संपत्तीची मालकी 
सूत्रांच्या माहितीनुसार मिथुन दा जवळपास 300 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. मुंबईव्यतिरिक्त त्यांच्याकडे उटीमध्येही स्वत:चं घर आहे. महागड्या कारची आवड असणाऱ्या या अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंज, फॉर्ड इंडीवर, टोयोजा फॉर्चूनर अशा एकाहून एक सरस कार आहेत. 


अभिनयासोबतच ते हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्येही नशिब आजमावलं. उटी, म्हैसूर यांसारख्या पर्यटनस्थळांवर त्यांची बरीच आलिशान हॉटेलंही आहेत. या माध्यमातूनही त्यांच्या कमाईत मोठी भर पडते.